शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकरांचं निधन

By admin | Updated: July 11, 2017 10:52 IST

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचं सोमवारी रात्रीच्या सुमारास निधन झाले आहे.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 11 - ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचं सोमवारी (10 जुलै) रात्री 10.30 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी दुपारी 1 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, मुलगा, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. तेंडुलकर यांचे 90वे व्यंगचित्रप्रदर्शन नुकतेच बालगंधर्व कलादालनात पार पडले होते. 

शेवटच्या दिवसांमध्येही त्यांचं व्यंगचित्र काढणं सुरूच होतं. 1954 मध्ये त्यांनी पहिलं व्यंगचित्र काढलं होतं. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या मृत्यूवरही व्यंगचित्र काढलं होतं. तेंडुलकर नाट्यसमीक्षकही होते. विनोदी आणि थोड्या तिरकस शैलीतील त्यांची नाट्य समीक्षा वाचनीय आहे.  त्यांची स्वारी बुलेटवर बसून निघाली की भल्याभल्यांना आश्चर्य वाटायचे. व्यंगचित्रांमधून पुण्यातील वाहतूक कोंडी व बेशिस्त यावर त्यांनी प्रहार केला. बोचऱ्या, मार्मिक पुणेरी भाष्य करणाऱ्या या व्यंगचित्रांनी वाहतूक शाखेला मदतही केली.
 
मंगेश तेंडुलकर सांगायचे की व्यंगचित्र ही माणसांची भूक आहे. हे केवळ थट्टा-मस्करीचे माध्यम नाही. त्यातून आदर, गौरव, काव्यात्मक आशयही व्यक्त करता येतो. त्यांनी काही विनोदी पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांचे अनेक ललित लेख वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. 
 
पुस्तके
भुईचक्र
संडे मूड : (५३ लेख आणि जवळपास तेवढीच व्यंगचित्रे असलेले पुस्तक)
 
पुरस्कार
संडे मूड’ पुस्तकासाठी शासनाचा वि.मा.दी. पटवर्धन पुरस्कार
मसापचा चिं.वि. जोशी पुरस्कार