शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल कंपनी, इमारतमालक यांच्यातील कराराची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2015 02:23 IST

न्यायालयात जाऊन महापालिकेला इमारतींवरील मनोऱ्यांच्या (मोबाईल टॉवर) कर वसुलीसाठी विरोध करणाऱ्या मोबाईल कंपन्यांना महापालिकाही आता कायद्याचा बडगा दाखविणार आहे.

पुणे : न्यायालयात जाऊन महापालिकेला इमारतींवरील मनोऱ्यांच्या (मोबाईल टॉवर) कर वसुलीसाठी विरोध करणाऱ्या मोबाईल कंपन्यांना महापालिकाही आता कायद्याचा बडगा दाखविणार आहे. इमारतमालक व मोबाईल कंपनी यांच्यात मनोऱ्यासंबंधी झालेल्या कराराची तपासणी आता मिळकत कर विभागाकडून करण्यात येणार आहे. इमारतीचा मालक हाच मूळ मालक असल्यामुळे त्याच्याकडून करवसुली करता येईल का, याबाबतही पालिका कायदेशीर सल्ला घेत आहे.उपमहापौर आबा बागुल यांनी हा कायदेशीर मुद्दा उपस्थित केला आहे. मिळकत कर विभागाला त्याप्रमाणे कारवाई करण्याचा आदेश देण्याबाबत आयुक्त कुणाल कुमार यांना त्यांनी पत्रही दिले होते. त्याप्रमाणे त्वरित कारवाई सुरू करण्यात येत असल्याचे मिळकत कर विभागप्रमुख सुहास मापारी यांनी सांगितले. पालिकेच्या वतीने न्यायालयातही हाच मुद्दा मांडण्यात येणार आहे. यात पालिकेला यश मिळाल्यास देशभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना त्याचा फायदा होणार आहे. एकट्या पुणे पालिकेचेच फक्त मनोऱ्यावरील करवसुलीचे २०० कोटी रुपये वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांकडे थकीत आहेत. न्यायालयाच्या आदेशामुळे पालिकेला कर वसूल करणे अवघड झाले आहे.यावर उपाय म्हणून आता मनोरे असलेल्या इमारतींचे मालक व ज्या कंपनीचा मनोरा आहे, ती कंपनी यांच्यातील कराराचा मसुदा मिळकत कर विभागाकडून तपासण्यात येणार आहे. एखाद्या सदनिकेत भाडेकरू ठेवला असल्यास, पालिका त्या सदनिकेची घरपट्टी त्या भाडेकरूकडून नाही तर मूळ मालकाकडूनच व नेहमीपेक्षा दुप्पट दराने वसूल करीत असते. इमारतीच्या टेरेसवर मनोरे बांधण्यास परवानगी देऊन त्यासाठी वार्षिक भाडे वसूल करणे यातही व्यावसायिक वापर स्पष्ट होतो, त्यामुळे कर जमा करणे ही मुळ मालकाचीच जबाबदारी आहे असा हा मुद्दा आहे. (प्रतिनिधी)करार करताना त्यात इमारत मालकाने मनोऱ्याचा वार्षिक कर जमा करण्याची जबाबदारी कंपनीकडेच दिलेली असते. ही रक्कम वगळूनच, तो त्याचे वार्षिक किंवा दरमहा भाडे वसूल करून घेत असतो. त्यामुळे कर जमा करण्याची जबाबदारी कंपनीचीही आहे; मात्र ते कर देत नसल्यास, मूळ मालकावर दंडात्मक कारवाई करता येते का, याबाबतही पालिकेकडून कायदेशीर सल्ला घेण्यात येत आहे.पालिका हद्दीतील एकूण मनोऱ्यांची संख्या १६३५ इतकी आहे. त्यांच्याकडून पालिकेला कर म्हणून १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक येणे आहे. यावर्षीची मागणी ९० कोटी रुपयांची आहे. थकबाकी व यावर्षीची मागणी वसूल होण्यात कायदेशीर अडचण निर्माण झाली आहे.