शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

गुढे ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2016 02:09 IST

येथे जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रभाग समितीच्या सभेत हिर्डोशी खोऱ्यातील हातभट्टीसह, सर्व प्रकारची दारूबंदी करण्याचा ठराव घेण्यात आला.

भोर : गुढे (ता.भोर) येथे जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रभाग समितीच्या सभेत हिर्डोशी खोऱ्यातील हातभट्टीसह, सर्व प्रकारची दारूबंदी करण्याचा ठराव घेण्यात आला. त्वरित कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सर्वानुमते मंजुरीही देण्यात आली. ठरावाच्या प्रती पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण) यांना पाठविण्यात आल्या आहेत. यावेळी पाणी, वीज, शाळांसह विविध विषयांवर चर्चा झाली.जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती वंदना धुमाळ यांनी गुढे येथे जिल्हा परिषदेच्या प्रभाग समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी उपसभापती मानसिंग धुमाळ, सुरेश राजिवडे, विठ्ठल दिघे, राजाराम दिघे, संतोष ढवळे, पांडुरंग गोरे, लक्ष्मण दिघे, विस्तार अधिकारी पी.डी साळुंके, अनेक गावचे सरपंच व ग्रामसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते. नीरा देवघर धरण भागातील रिंग रोडवरील पऱ्हर बु. व पऱ्हर खु., म्हसर खोऱ्यातील म्हसर बु. धनगरवस्ती येथे हातभट्टी तयार करून, निगुडघर व परिसरात विकली जाते. यामुळे अनेक गावांत दारू पिण्यात वाढ झाली आहे. भांडण-तंटे, वादविवाद वारंवार होत आहेत. त्यामुळे सर्व गावांतील हाभट्टीची दारू व निगुडघर येथील अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी विविध गावच्या सरपंच यांनी प्रभाग समितीत केली. त्यावर समितीच्या अध्यक्षा वंदना धुमाळ यांनी तसा ठराव मंजूर करून, ठरावाच्या प्रती पोलीस निरीक्षकांना व पुणे ग्रामीणच्या अधीक्षकांना देण्याच्या सूचना यावेळी दिल्या. शिक्षक राहात नाहीत, वेळेवर शाळेत येत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन वंदना धुमाळ यांनी दिले. अंगणवाडी व शाळादुरुस्तीसाठी प्रत्येक शाळेला व अंगणवाडीला ५० हजार रुपये अनुदान देण्यात येणार असून, सर्वांनी आपापल्या गावच्या दुरुस्तीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करण्याचे आवाहन वंदना धुमाळ यांनी केले.