शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वेंगसरकर, पीडीसीए विजयी

By admin | Updated: May 11, 2017 04:34 IST

यजमान पीसीएमसीज् व्हेरॉक वेंगरसरकर अ‍ॅकॅडमी आणि पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेने (पीडीसीए) संघाने १३ वर्षांखालील

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : यजमान पीसीएमसीज् व्हेरॉक वेंगरसरकर अ‍ॅकॅडमी आणि पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेने (पीडीसीए) संघाने १३ वर्षांखालील व्हेरॉक चषक क्रिकेट स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.वेंगसरकर अ‍ॅकॅडमीने सोलापूरच्या पुष्प अ‍ॅकॅडमीवर १२० धावांनी दणदणीत विजय मिळविला. त्यांचा तनिष्क सितापुरे सामनावीर ठरला. दुसऱ्या सामन्यात पीडीसीएने प्राधिकरण जिमखाना संघावर ४१ धावांनी सहज मात केली. आकाश निमक सामनावीर ठरला.प्रथम फलंदाजी करताना सितापुरेच्या ६५ धावांमुळे वेंगसरकर अ‍ॅकॅडमीने २५ षटकांत ३ बाद १९३ अशी भक्कम मजल मारली. सितापुरेला तिलक जाधव (५६) आणि विराज काकडे (नाबाद ३३) यांनी सुरेख साथ दिली. पुष्प अ‍ॅॅकॅडमीच्या हरजस कोहलीने दोन बळी घेतले. पुष्प अ‍ॅकॅडमीला २९.४ षटकांत ७३ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यांच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही. अवांतर ३१ धावा सर्वाधिक ठरल्या. वेंगसरकरच्या सितापुरेने अष्टपैलू कामगिरी करताना ६ धावांत दोन बळी घेतले. त्यांच्या दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पीडीसीएने ४ बाद १४० धावा केल्या. त्यांच्या आकाश निमकने नाबाद ५८ आणि वरुण चौधरीने ३१ धावा केल्या. प्राधिकरण जिमखान्याच्या कमल शर्माने दोन गडी बाद केले. प्राधिकरणला ८ बाद ९९ धावा करता आल्या. त्यांच्या आर्यन परदेशीने २५ धावा केल्या. पीडीसीएच्या वरुण चौधरीने दोन गडी बाद केले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मंगळवारी सकाळच्या सत्रातील उद्घाटनाच्या सामन्यात यजमान व्हेरॉक वेंगसरकर अ‍ॅकॅडमीने क्रिकेट मास्टर्स अ‍ॅकॅडमीवर ७१ धावांनी मात केली. व्हेरॉकचा तनिष्क तनपुरे (५४ धावा) सामनावीर ठरला. दुसऱ्या सामन्यात पुणे जिल्हा क्रिकेट संघटना संघाने पीवायसी जिमखान्यावर १३ धावांनी चुरशीचा विजय मिळविला. २४ धावांत चार बळी घेणारा वरुण चौधरी सामनावीर ठरला. पीसीएमसीज् व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी आयोजित १३ वर्षांखालील मुलांच्या व्हेरॉक चषक क्रिकेट स्पर्धेस थेरगाव येथील मैदानावर मंगळवारी सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक अभिषेक बारणे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी अकादमीचे सर्व प्रशिक्षक उपस्थित होते.