शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नळकोंडाळ्यांवर विक्रेत्यांची दादागिरी

By admin | Updated: March 31, 2017 02:15 IST

सार्वजनिक नळ कोंडाळ्यावर चायनीज व खाद्यपदार्थ विक्री करणारे दादागिरी करीत असल्याचे चित्र

बारामती : सार्वजनिक नळ कोंडाळ्यावर चायनीज व खाद्यपदार्थ विक्री करणारे दादागिरी करीत असल्याचे चित्र बारामती शहरात आहे. नगरपालिकेने खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना प्रतिबॅरल ३० रुपयांप्रमाणे शुल्क ठरवून दिले आहे. मात्र या प्रकारावर कोणतेही नियंत्रण नसल्याने खाद्यपदार्थ विक्रेते नगरपालिकेचे पाणी फुकटच वापरत आहेत. सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे साहजिकच पाण्यासाठी सार्वजनिक नळ कोंडाळ्यांवर शहरामध्ये गर्दी दिसते. तीन हत्ती चौकातील नीरा कॅलन सोसायटीच्या लगत असणाऱ्या नळ कोंडाळ्यावर परिसरातील रहिवासी पाणी भरण्यासाठी येत असतात. मात्र तीन हत्ती चौक, भिगवण चौक, पूनावाला गार्डन येथील खाद्यपदार्थ, चायनीज विक्रेते मोठ-मोठे बॅरल घेऊन रांगा लावतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पाणी भरण्यासाठी तासन्तास ताटकळत उभे रहावे लागते. (प्रतिनिधी)नगरपालिकेचे कर्मचारी शुल्क वसूल करत नाहीतबारामती नगरपालिकेने खाद्यपदार्थ विक्रेत्यांना प्रतिबॅरल ३० रु. असा दर ठरवून दिला आहे. मात्र नगरपालिकेचा कोणताही कर्मचारी त्याची वसूल करताना दिसत नाही. तसेच विक्रेतेदेखील सार्वजनिक नळकोंडाळ्यावर गर्दी करून फुकटच पाणी भरतात. त्यामुळे नगरपालिकेचेही आर्थिक नुकसान होत आहे. तातडीने या विक्रेत्यांवर कारवाई करावी. तसेच विक्रेत्यांना पाण्याची वेगळी सोय नगरपालिकेने करून द्यावी. त्यामुळे सार्वजनिक नळकोंडाळ्यांवरची गर्दी कमी होईल, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. याबाबत मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.