शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 18:27 IST

पुण्यातील वडगांव बुद्रूक येथील प्रकार; नागरिकांत घबराटीचे वातावरण

पुणे /धायरी : मोटारसायकलवरुन आलेल्या तिघा जणांनी १२ वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला़ ही घटना सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक परिसरात मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.वडगांव बुद्रुक परिसरात एका टोळक्याने दहशत माजवित १२ वाहनांच्या काचा फोडल्याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे तपासले असता रात्री एकच्या दरम्यान एका मोटारसायकलवरून आलेल्या तीन तरुणांनी सदर परिसरातील वाहनांच्या काचा फोडल्या चे दिसून आले आहे.आरोपींच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना झाली असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असे सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांनी ' लोकमत ' शी बोलताना सांगितले. तरुणांनी दारू पिऊन हे कृत्य केले असल्याचे काही नागरिकांनी लोकमत प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. याबाबत अधिक तपास सिंहगड रस्ता पोलिस करीत आहेत.

वाहनांच्या तोडफोडीचे सत्र पुन्हा सुरू; नागरिक भीतीच्या छायेतमागील काही दिवसांपासून सिंहगड रस्ता परिसरात सुरू असलेले वाहन तोडफोडीचे सत्र काही केल्याने थांबण्याचे नाव घेत नाही. फेब्रुवारी महिन्यातच वडगांव बुद्रुक येथील तुकाई नगर परिसरात वाहनांची तोडफोड करीत दहशत पसरवीत गोळीबार केल्याची घटना घडली होती. तर मार्च मध्ये धायरी परिसरात चार वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. सिंहगड रस्ता परिसरात पुन्हा टोळक्यांचा वाद निर्माण होऊन वाहने तोडफोडीचे सत्र दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशा तरुणांना पोलिसांनी वेळीच जरब बसविणे गरजेचे असल्याचे मत काही नागरिकांनी व्यक्त केले.लवकर मलमपट्टी केली नाही म्हणून क्लिनिकच्या काचा फोडल्याशनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास वडगांव बुद्रुक येथील चव्हाण क्लिनिक मध्ये  डॉ. पृथ्वीराज चव्हाण हे एका रुग्णावर उपचार करीत असताना एक तरुण केबिनमध्ये आला व म्हणाला की माझ्या करंगळीला दुखापत झाली आहे. मला लगेच मलमपट्टी करा. त्यावर डॉक्टरांनी अगोदरच रुग्णावर उपचार झाल्यानंतर तुमची मलमपट्टी करतो असे सांगितल्यावर बाहेर थांबलेल्या त्याच्या दोन मित्रांनी कोयत्याच्या साहाय्याने क्लिनिकच्या काचा फोडल्या. यामध्ये डॉक्टरांना थोडी दुखापत झाली असून याबाबत सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.