शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारासाठी वाहनांची फौज सज्ज

By admin | Updated: February 11, 2017 02:48 IST

जिल्हा परिषदेचा प्रचार आता जोरात सुरू झाला असून, मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवारांची निवडणूक घाई चालू आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) प्रचारासाठी पक्ष चिन्ह असलेला रथ

पुणे : जिल्हा परिषदेचा प्रचार आता जोरात सुरू झाला असून, मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवारांची निवडणूक घाई चालू आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) प्रचारासाठी पक्ष चिन्ह असलेला रथ, चारचाकी व तीनचाकी अशा साडेचारशे वाहनांची परवानगी विविध उमेदवारांनी घेतली असून, त्यात पावणेतीनशे रिक्षा आहेत. मतदारराजापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडे जेमतेम दहा दिवस शिल्लक आहेत. प्रभागाचा विस्तार पूर्वीपेक्षा अधिक असल्याने कमीत कमी वेळेत मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान उमेदवारांसमोर आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पदयात्रा, प्रत्यक्ष घरोघरी जाऊन गाठीभेठी घेणे, कोपरा सभा, पत्रके, जाहीराती, सोशल मीडिया अशा विविध आयुधांचा वापर उमेदवारांकडून सुरूच आहे. याशिवाय प्रसिद्ध मराठी, हिंदी गीतांच्या संगीतावर उमेदवाराचे प्रचारगीत वाजविले जात आहे. याशिवाय उमेदवाराची ओळख सांगणारी वाहनेदेखील प्रभागातून फिरविली जात आहेत. काही जणांनी वाहनात बदल करून रेल्वेचे स्वरूप देण्यात आले आहे, तर काही वाहनांवर कमळ, घड्याळ, धनुष्य अशी विविध पक्ष चिन्हे लावण्यात आल्याचे दिसून येत आहे. रिक्षांवर ध्वनिक्षेपक व पक्ष चिन्हाचा बोर्ड लावून प्रचार सुरू आहे. तसेच उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या खासगी चारचाकी वाहनांवरूनही पक्षचिन्ह व उमेदवाराचे छायाचित्र लावून प्रचार करण्यात येत आहे. त्यामुळे प्रचारासाठी वाहनांना परवानगी घेण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची परिवहन विभागात शुक्रवारी गर्दी उसळली होती. मात्र, अशा पद्धतीने प्रचार करण्यासाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला कळविणे बंधनकारक असून, त्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे शुक्रवारअखेर शहरातून ३९६ वाहनांना प्रचाराची परवानगी देण्यात आली होती. त्यात २७६ रिक्षांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेसाठी ११ चारचाकी वाहनांना परवानगी दिली आहे. बारामती परिवहन कार्यालयातून २० वाहनांना परवानगी दिली असून, ३० अर्जांवर कार्यवाही सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)