शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

पुणे-नगर रस्त्यावर वाहतूक कोंडीने वाहनांच्या रांगा

By admin | Updated: January 1, 2015 23:45 IST

मान्यवरांसह महाराष्ट्रासह विविध राज्यांतूनआलेल्या लाख आंबेडकरी बांधवांनीआज दिवसभर अलोट गर्दी केली होती.

कोरेगाव भिमा : भीमाकाठावरील कोरेगाव भीमा नजीक ऐतिहासिक विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी विविध पक्ष , संघटना , व मान्यवरांसह महाराष्ट्रासह विविध राज्यांतूनआलेल्या लाख आंबेडकरी बांधवांनीआज दिवसभर अलोट गर्दी केली होती. यामुळे पुणे-नगर रस्त्यावर गर्दीमुळे चारही बाजूंनी येणारी वाहतूक लोणीकंद व शिक्रापूर पोलिसांनीही पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. यामुळे वाहतुक कोंडी मागील वर्षांच्या तुलनेत कमी झाली होती तरीही सायंकाळी वाहनांच्या कोंडी झाल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच पुण्याकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. बुधवार दि. ३१ रोजी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पुणे-नगर महामार्गावरिल कोरेगाव भिमा जवळील परणे फाटा येथे विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून आलेल्या आंबेडकरी बांधवांच्या वाहनासह या मार्गावरुन जाणाऱ्या वाहनांमुळे मोठ्याप्रमाणावर वाहतुक कोंडी होत असते. हि वाहतुक कोंडी टाळण्यासाठी मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ नुसार आज सकाळी ६ ते रात्री ९ यावेळेत पुणे-नगर महामार्गावरिल वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्याच्या सुचना पोलीस प्रशासनाला दिल्या होत्या. मानवंदना देण्यासाठी आलेल्या आंबेडकरी बांधवांच्या वाहनांच्या पार्कींगसाठी कोरेगाव भिमा येथिल एस. टी. स्टँड जागा , ग्रामपंचायतजवळील मैदान , डिंग्रजवाडी फाटा , वाडागाव फाटा याठिकानी पार्किंगची व्यवस्था केली होती. (वार्ताहर)४शिक्रापूर पोलीसांनी अहमदनगर बाजुकडून पुण्याकडे येनाऱ्या वाहतुकीत बदल करित नगर-कल्याण मार्ग , शिरुर-न्हावरा फाटा मार्गे सोलापूर रस्ता , शिक्रापूर-चाकण मार्गे , शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-विठ्ठलवाडी मार्गे वाघोली , कोरेगाव भिमा-वढु-चौफुला मार्गे चाकण यामार्गावरुन वाहतुक शिक्रापूर पोलीसांनी वळविण्यात आली असल्यचे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक श्रीकांत कंकाळ यांनी सांगीतले. ४तर लोणीकंद पोलीसांनी पुण्याकडून नगरकडे जाणारी वाहतुक बायपासवरुन सोलापूर रस्त्याने केडगाव चौफुला मार्गे वळविण्यात आल्याचे लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक तुकाराम जाधव यांनी सांगीतले. पोलिसांच्या नियोजनामुळे पुणे-नगर मार्गावरिल वाहतुक दोन्ही बाजुंनी वळविण्यात आल्याने दरवर्षीपेक्षा वाहतुक कोंडी कमीप्रमाणात झाली होती.