शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर महामार्गावर वाहनांच्या रांगा

By admin | Updated: January 10, 2017 02:26 IST

‘मोदी सरकार हाय-हाय, पैसा आमचा कष्टाचा- नाही कोणाच्या बापाचा, मंत्रिमंडळ तुपाशी- शेतकरी मात्र उपाशी’ अशा घोषणा देऊन

भिगवण : ‘मोदी सरकार हाय-हाय, पैसा आमचा कष्टाचा- नाही कोणाच्या बापाचा, मंत्रिमंडळ तुपाशी- शेतकरी मात्र उपाशी’ अशा घोषणा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे यांनी कार्यकर्त्यांसह सुमारे २० मिनिटे पुणे-सोलापूर महामार्ग रोखून धरून मोदी सरकारच्या नोटाबंदीचा निषेध केला.या वेळी तालुक्याचे आमदार दतात्रय भरणे, अप्पासाहेब जगदाळे, भिगवण गावाच्या सरपंच हेमाताई माडगे, प्रदीप वाकसे, दशरथ माने, प्रताप पाटील, डी. एन. जगताप, तुकाराम बंडगर, महेश देवकाते, मनोज राक्षे, संदीप वाकसे, अशोक पाचांगने, विक्रम शेलार यांनी रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला. या वेळी खासदार सुळे यांनी सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली. या वेळी खासदार सुळे म्हणाल्या, ‘‘सरकारचे हे धोरण शेतकरी आणि कष्टकरी जनतेच्या मुळावर उठले आहे. याचा त्रास फक्त सर्वसामान्यांना होत आहे. तसेच, जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक असून, सरकारने तातडीने निर्बंध उठवावेत. २० मिनिटे चाललेल्या या आंदोलनामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वेळी पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकेला भिगवण पोलिसांनी पर्यायी मार्गाने पाठविण्याची व्यवस्था केल्याने कोणताही अडचणीचा प्रसंग उद्भवला नाही. या वेळी आंदोलनामध्ये तालुक्यातून अनेक पदाधिकारी तसेच भिगवणचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसीलदार श्रीकांत पाटील यांना निवेदन देऊन रास्ता रोको मागे घेण्यात आला.