शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांच्या किमती करवाढीमुळे वाढणार

By admin | Updated: March 19, 2016 02:45 IST

विविध करांत सुलभता आणल्याचे सांगत, महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्र सरकारपाठोपाठ उद्योगावर ०.५ व्हॅट वाढवला. यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात उत्पादनाचा खर्च

भोसरी : विविध करांत सुलभता आणल्याचे सांगत, महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्र सरकारपाठोपाठ उद्योगावर ०.५ व्हॅट वाढवला. यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात उत्पादनाचा खर्च वाढणार आहेत. परिणामी, वाहनांचे दरात आणखी वाढ होणार आहे. सध्याच्या या क्षेत्रातील मंदीच्या काळात आॅटोमोबाइल उद्योगाच्या स्थलांतराचा वेग वाढण्याची भीती औद्योगिक क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. उद्योगवाढीसाठी ‘मेक इन महाराष्ट्र’ धोरण असलेल्या राज्याकडून अपेक्षाभंग झाल्याने नाराजीचा सूर आहे. पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिकनगरीस ‘आॅटोमोबाईल हब’ म्हणून ओळख आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाप्रमाणेच महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पाने उद्योग क्षेत्राकडून असलेल्या मोठ्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. उत्पादित करपात्र वस्तूंवरील व्हॅट ५ टक्क्यांहून ५.५ इतका केला आहे. फेब्रुवारीतील केंद्रीय अर्थसंकल्पात उद्योगावर ०.५ कृषी अधिभार लावण्यात आला. आता राज्यानेही अर्ध्या टक्का व्हॅटमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे महागाईत भर पडणार आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक कर आहेत. त्यात आणखी भर पडली आहे. स्पर्धक राज्याबरोबर असलेल्या तीव्र स्पर्धेत राज्यातील उद्योजकांना निभाव धरणे अधिक अवघड होऊन बसले आहे. उत्पादन खर्च वाढून वाहनांच्या किमती वाढणार आहेत. परिणामी राज्यातील उद्योजक स्पर्धेत मागे पडू शकतात. पिंपरी-चिंचवड, पुणे व शेजारच्या औद्योगिक परिसरात वीज दर घटविण्याची मागणी प्रलंबित आहे. त्याकडे दुर्लक्ष करीत मराठवाडा व विदर्भात विजेचे दर कमी केले आहेत, असा भेदभाव औद्योगिक वातावरण बिघडविण्यास कारणीभूत ठरेल. (वार्ताहर)विक्रीकर आणि इतर करप्रणाली सोपी करून त्यात सुलभता आणली जाणार आहे. मात्र, ही अपेक्षा पोकळ असल्याचे उद्योजकांचे मत आहे. उद्योग क्षेत्राला दिल्या जाणाऱ्या सवलतींसाठी २६२५ कोटींची तरतूद केली आहे. तसेच, महाराष्ट्र उद्योजकता परिषदेची स्थापना केली आहे. मात्र, या संदर्भात स्पष्टता नाही. त्यामुळे उद्योजकांमध्ये संभ्रम आहे. हा निधी कोठे खर्च करणार आणि परिषदेची संकल्पना स्पष्ट झालेली नाही.औद्योगिक उत्पादनासाठीचा खर्च (कॉस्ट आॅफ प्रॉडक्शन) कमी होण्यासाठी पुणे, पिंपरी- चिंचवड, मुंबई, नाशिकसारख्या सुविधा व औद्योगिक वातावरण नसेल, तर उद्योगवाढीस मर्यादा पडणार आहेत. शेतीला उद्योगाचा दर्जा देण्याच्या मागणीकडे पुन्हा दुर्लक्ष केले गेले. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सवलती आणि योजना देण्याचे जाहीर केले असले, तरी प्रत्यक्ष कर्जबाजारी शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळणार नसल्याचा मतप्रवाह आहे.