पिंपरी : संत तुकारामनगरमधील १७ वाहनांच्या तोडफोडीच्या घटनेनंतर तिसऱ्याच दिवशी निगडी-प्राधिकरणातही अज्ञात व्यक्तीने मोटारीची तोडफोड केली आहे. सेक्टर क्र. २८ मध्ये रात्री दोन ते पहाटे पाचच्या दरम्यान ही घटना घडली. वैयक्तिक वादातून हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी संत तुकारामनगर येथील महेशनगर येथे अज्ञाताने १७ गाड्यांची तोडफोड केली होती. यामध्ये पीएमपीच्या तीन बसचादेखील समावेश होता. गेल्या काही दिवसांमध्ये पिंपरी-चिंचवड परिसरात गाड्यांचे नुकसान करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. थेरगाव, नेहरूनगर, आनंदनगर भागात अशा घटना यापूर्वी घडल्या आहेत. (प्रतिनिधी)
निगडीमध्ये वाहनाची तोडफोड
By admin | Updated: December 22, 2016 01:55 IST