शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाज्यांची आवक १३ टक्केच

By admin | Updated: June 3, 2017 02:45 IST

थील कै. अण्णासाहेब मगर आवार बाजार मांजरी उपसमितीमध्ये दररोज येणाऱ्या भाजीपाल्यापेक्षा शुक्रवारी केवळ १३ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कहडपसर : येथील कै. अण्णासाहेब मगर आवार बाजार मांजरी उपसमितीमध्ये दररोज येणाऱ्या भाजीपाल्यापेक्षा शुक्रवारी केवळ १३ टक्के आवक झाल्याने शेतकरी व शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या संपाला भरघोस प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. दुपारी या समितीच्या प्रवेशद्वारावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना प्राचारण केल्याने वातावरण नियंत्रित झाले. या  संपामुळे सर्वसामान्यांना भाजीपाला महाग मिळण्याची चिन्हे दिसू  लागली आहे.या बाजार समितीमध्ये दररोज सकाळी ११.३० ते २.३० या दरम्यान मोठ्या प्रमाणावर भाजीपाला व तरकारीची आवाक होत असते. दररोज १७०० ते १८०० क्विंटल भाजीपाला येत असतो. मात्र आज शेतकऱ्यांचा माल केवळ २१४ क्विंटल एवढाच आला. त्यामध्ये टोमॅटो, पालक, मेथी, कोंथिबीर हा भाजीपाला होता. दुपारी २.३० ला घंटा वाजला की बाजार सुटतो. मात्र आज हडपसर व परिसरातून व्यापारी व नागरिक भाजीपाला नेण्यासाठी आले होते. त्यांना मोकळ्या हाताने परतावे लागले. त्यामुळे हडपसरच्या भाजी मंडईमध्ये व इतरत्र असलेल्या भाजी मंडईतून नागरिकांना आज भाजीपाला महाग मिळणार आहे. काल आणलेला भाजीपाला आज व्यापाऱ्यांना विकण्यासाठी होता. मात्र उद्या परिस्थितीत अशीच राहिली तर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर भाजीचे दर जातील. दुपारी दोनच्या दरम्यान काही शेतकरी व व्यापारी तसेच शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते समितीमध्ये जमल्याने उपाययोजना म्हणून पोलिसांना बोलविण्यात आले. त्यानंतर परिस्थिती आवाक्यात आली. शेतकऱ्यांच्या गाड्या बाजार समितीत आज आल्याच नाहीत.