शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

वेध विलिनीकरणाचे : वडाची वाडी २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:09 IST

वडाची वाडी ग्रामस्थांची वाढत्या अतिक्रमणांमुळे अपेक्षा दीपक मुनोत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहराच्या परिघावरील वडाची वाडी येथे नवीन ...

वडाची वाडी ग्रामस्थांची वाढत्या अतिक्रमणांमुळे अपेक्षा

दीपक मुनोत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहराच्या परिघावरील वडाची वाडी येथे नवीन बांधकामांना वेग आला आहे. वाढत्या नागरिकरणामुळे अतिक्रमणांमध्ये वाढ होत असल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत. महापालिकेने प्राधान्याने नियोजन केल्यास गाव बकाल होणार नाही, असे त्यांना वाटते.

वडाची वाडी गावाची लोकसंख्या सुमारे तीन हजार असून वार्षिक महसूल ६५ लाख रुपये आहे. त्या माध्यमातून गावात वेगवेगळ्या ठिकाणी विकासकामे सुरु आहेत. मात्र, नागरिकांना होणारा जाच कमी झालेला नाही. गावात अद्याप सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. महापालिकेने स्वच्छतागृहे बांधून द्यावीत अशी मागणी काही ज्येष्ठांनी केली. गावात विरंगुळा केंद्र, व्यायामशाळा नाही, उद्यान नसल्याने फिरण्यासाठी आणि व्यायामाला जायचे कुठे, असा सवाल युवकांनी केला.

गावात आसपास महाविद्यालयांची सुविधा नसल्याने महाविद्यालयीन तरुणांना पुणे शहरात किंवा शाळेसाठी कात्रजला इतर ठिकाणी जावे लागते. महापालिकेने आम्हाला चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठीही प्रयत्न करावेत, असेही काही विद्यार्थ्यांनी नमूद केले.

वाढत्या नागरीकरणामुळे आता वडाची वाडीला शहराचं रुप येत आहे. मोठमोठी बांधकामे सुरू झाली आहे. गाव बकाल होऊ नये याची काळजी महापालिकेने घ्यायला हवी. आता गावात अतिक्रमण वाढत आहे. त्यातून रस्त्यांना जागा कमी पडते. परिणामी वाहतूक कोंडी होते. त्याचबरोबर अतिरिक्त बांधकामांवर निर्बंध आणावेत, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली .

कोट

याआधी जी अकरा गावे महापालिकेत समाविष्ट झाली त्यांचा विकास झाला का? नाही. मग आमच्या गावाचा समावेश करुन फक्त राजकीय उद्देश साधला जाईल.

-रोहित जाधव, युवक

फोटो ओळ :

गावातील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी कचरा टाकला जात असून याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली.