शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

वारकऱ्यांना मिळणार आरोग्य सुविधा

By admin | Updated: June 26, 2017 03:36 IST

आषाढीवारी व पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यात पालखी मुक्कामाच्या काळात वारकरी भाविकांना पुरेशा प्रमाणात

लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : आषाढीवारी व पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यात पालखी मुक्कामाच्या काळात वारकरी भाविकांना पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा देण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सुसज्ज ठेवण्यात आला आहे. सर्वांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने यांनी दिली.माने म्हणाले की, २५ ते २९ जून पर्यंत आषाढीवारीचे वारकरी व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, श्री संत सोपानकाका, श्री संत चौरंगीनाथ, श्री संत चांगावटेश्वर व संत निळोबाराय आदिंच्या पालख्या इंदापूर तालुक्यातून मार्गस्थ होणार आहेत. वारकऱ्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व त्याअंतर्गत येणारी शासकीय उपजिल्हा रग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधीक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.पालखी मार्गावर एकूण दहा उपकेंद्र आहेत. १२ तात्पुरती औषध उपचार केंद्र आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी ६ औषधोपचार केंद्र आहेत. ५ रुग्णवाहिका आहेत. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी असे ८१ जणांचे मनुष्यबळ आहे, असे सांगून ते म्हणाले की, ३१८ पाण्याचे स्त्रोत आहेत. त्यामध्ये २२७ विहीरी, ८१ विंधन विहीरी,१० सार्वजनिक टाक्यांचा समावेश आहे. लहान मोठी ६९ उपहारगृहे, १० टँकर भरण्याची ठिकाणे आहेत.पिण्याच्या पाण्याचे नियमित शुध्दीकरण करुन त्याची चाचणी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. डास निर्मूलनासाठी व अन्य कोणते रोग होवू नयेत या करीता, ग्रामपंचायत स्तरावर औषधे व धूरफवारणी करण्यात येत आहे. रुग्णालयातील बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभाग सुरु करण्यात आले आहेत. मेडीक्लोर, एव्हीएस, एआरव्ही व साथीच्या रोगांवरील औषधे उपलब्ध करुन घेण्यात आली आहेत. पालखी मार्गावरील गावांमध्ये कीटकशास्त्रीय सर्वेक्षण, धूरफवारणी,कोरडा दिवस पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.मुक्कामाच्या ठिकाणी वैद्यकीय व आपत्कालिन सेवा पुरवण्यास सांगण्यात आले आहे. सर्व उपाहारगृहाची स्वच्छताविषयक तपासणी व तेथील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यास सांगितले आहे. टँकर भरण्याच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. टँकरमधील पाणी शुद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची व टीसीएल पावडरच्या नमुन्याची तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे. भवानीनगर ते सराटी या पट्ट्यात १७ फिरतीवर वैद्यकीय पथके नेमण्यात आली आहेत. दिंडी प्रमुखांना औषधाचे कीट मोफत देण्यात येणार आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्यविषयक शिक्षण व प्रदर्शन ठेवण्यात येणार आहे, असे माने यांनी स्पष्ट केले.