वडगाव काशिंबेग (ता.आंबेगाव)येथील श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती देवस्थान तीर्थक्षेत्र येथे गणेशोत्सव पार पडत आहे. सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचे संकट असल्याने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. दरवर्षी गणेशोत्सवात येथे गणेश फेस्टिवल साजरा केला जातो. मात्र, मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी केवळ धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. महाद्वार यात्रा पार पडली असून, गणेश याग आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे सचिव शरद निसाळ यांनी दिली. गणेशोत्सव कालावधीमध्ये पेशवेकालीन गणपती मंदिर, तसेच परिसरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. उद्योजक श्यामभाऊ गुंजाळ यांच्या वतीने सलग दहा दिवस फुलांची सजावट करण्यात येत आहे. दरम्यान, येथे दररोज सकाळी महापूजा सकाळ व संध्याकाळ आरती आदी कार्यक्रम पार पडत असल्याची माहिती देवस्थानचे पुजारी तिवारी काका यांनी दिली.
१५ मंचर काशिंबेग
श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग येथील पेशवेकालीन अर्धपीठ गणपती मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.