शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र दाभाडे यांच्या वाढदिनी विविध उपक्रम

By admin | Updated: June 30, 2015 00:32 IST

येथील हिंदविजय नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक तथा माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, मोफत आरोग्य तपासणी शिबिर

तळेगाव स्टेशन : येथील हिंदविजय नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक तथा माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, हिंदविजय अभ्यासिकेचे उद्घाटन, शालेय साहित्यवाटप, वै. सखुबाई हिंगे विद्यार्थी वसतिगृहास आर्थिक मदत व सुशिक्षित बेरोजगारांसाठी विविध कोर्सचे आयोजन आदी समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आले.पतसंस्थेने लाइफ लाइन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या साहाय्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. मावळ डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप भोगे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. माजी आमदार रुपलेखा ढोरे, नगराध्यक्षा सुलोचना आवारे, जयसिंग भालेराव, नगरसेविका नीलिमा दाभाडे, अ‍ॅड. मच्छिंद्र गटे, जगन्नाथ शेवकर, मधुकर ढोरे-पाटील, पतसंस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ दाभाडे उपस्थित होते. लाइफलाइन हॉस्पिटलचे डॉ. सुनील कुंभार यांनी प्रास्ताविक केले.स्टेशन परिसरातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांसाठी पतसंस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिकेचे उद्घाटन ग्रामप्रबोधिनी विद्यालयाचे प्राचार्य व्यंकट भताने यांच्या हस्ते झाले. सहायक निबंधक मुकुंद पवार यांच्या हस्ते नगर परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप झाले. सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता सर्व सोर्इंनीयुक्त अभ्यासिका माजी मुख्याध्यापक राजाराम ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली.अ‍ॅड. दाभाडे यांनी आपल्या मनोगतात शालेय, तसेच महाविद्यालयीन शिक्षणाच्या खडतर प्रवासाचे वर्णन केले. शिक्षण मंडळाचे सभापती महेश फलके, रुडसेट संस्थेचे संचालक सुनील मेहेंदळे, संतोष दाभाडे-पाटील, राष्ट्रपती पदकविजेते शिक्षक श्याम इंदोरे, श्रीकृष्ण मुळे यांनी मनोगत व्यक्त करून दाभाडे यांना शुभेच्छा दिल्या.माजी उपनगराध्यक्ष श्याम दाभाडे, माजी जि.प. सदस्य प्रशांत ढोरे, वसंत बारवे, बाळासाहेब शिळीमकर, अनेक शाळांचे मुख्याध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.संचालक राजेश सरोदे यांनी प्रास्ताविक केले. सचिव कैलास भेगडे यांनी सूत्रसंचालन केले, तर देवराम वाघोले यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी पतसंस्थेचे संचालक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. आमदार संजय भेगडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबन भेगडे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, पुणे जिल्हा संघचालक सुरेश शहा, उद्योजक कौशिक शहा, अरुण भेगडे-पाटील, नंदकुमार शेलार, हभप माऊली दाभाडे, माजी नगरसेवक यशवंत दाभाडे, दिलीप खळदे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती रवींद्र आवारे, सुरेश दाभाडे आदींनी अ‍ॅड. रवींद्र दाभाडे यांना शुभेच्छा दिल्या. (वा.प्र)