शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाल्हेला माऊलींची ग्रामप्रदक्षिणा होणारच

By admin | Updated: July 2, 2016 12:55 IST

वाल्हे येथे माऊलींची प्रदक्षिणा होणार नसल्याचे कळाल्यानंतर वाल्हे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत प्रदक्षिणा होणारच, असा ठराव ग्रामसभेत केला.

वाल्हे : परंपरेनुसार होत असलेली वाल्हे येथे माऊलींची प्रदक्षिणा होणार नसल्याचे कळाल्यानंतर वाल्हे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत प्रदक्षिणा होणारच, असा ठराव ग्रामसभेत केला.माऊलींची पालखी ४ जुलैैला वाल्हे येथे मुक्कामी येणार आहे. परंपरेनुसार वाल्हे ग्रामस्थ पालखी खांद्यावर घेऊन गावातून ग्रामप्रदक्षिणा करून पालखीतळापर्यंत पालखी खांद्यावर नेतात. मात्र ही प्रदक्षिणा होणार नसल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली होती. त्यामुळे बुधवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी अनेक ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. परंपरा मोडू नये, लोकांच्या भावनेचा तो भाग असून भावना दुखावू नयेत, असे आवाहन या वेळी करण्यात आले. ग्रामप्रदक्षिणा होणारच, असा ठराव मंजूर करण्यात आला. सोहळ्याला सर्व सुविधा देऊन सहकार्य करण्यात येईल व गावकरी गुढ्या उभारून व रांगोळ्या काढून स्वागत करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामसभेच्या ठरावाची प्रत जिल्हाधिकारी, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त, मालक, चालक, प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलिसांना देणार असल्याचे सरपंच कल्पना गोळे यांनी सांगितले.या वेळी उपसरपंच पोपटनाना पवार, भाजपा तालुकाध्यक्ष सचिन लंबाते, माजी सरपंच दत्तात्रेय पवार, महादेव चव्हाण, सजंय गांधी निराधारचे गिरीश नाना, तंटामुक्ती अध्यक्ष सतीश सूर्यवंशी, पोलीसपाटील प्रवीण कुमठेकर, सूर्यकांत पवार, चेअरमन मदन भुजबळ, दत्तात्रेय राऊत, ग्रामविकास अधिकारी गाताडे, माऊली भुजबळ, दादा मदने, दीपक कुमठेकर, सचिन देशपांडे, अतिश जगताप, देविदास पांडकर, तुषार भुजबळ, सुहास खवले, सागर भुजबळ, धनंजय पवार, राजेंद्र गायकवाड, दिलीप पवार, ग्रामपंचायत सदस्य व पोलीस हवालदार निगडे व संदीप पवार, अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)