शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

वैष्णवांचा मेळा पुण्यात

By admin | Updated: July 2, 2016 12:56 IST

पंढरीच्या विठुरायाचा मुखी अखंड जयघोष करीत लाखोच्या संख्येने वैष्णवांचा मेळा शहरात दाखल झाल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय बनले.

पुणे : पंढरीच्या विठुरायाचा मुखी अखंड जयघोष करीत लाखोच्या संख्येने वैष्णवांचा मेळा शहरात दाखल झाल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय बनले. पाटील इस्टेट येथील उड्डाणपुलाखालच्या चौकात पालख्यांच्या स्वागतासाठी महापालिकेकडून विशेष कक्ष उभारण्यात आला होता. याचबरोबर इतर राजकीय पक्ष, संस्था, बँका यांनीही स्वागतासाठी कक्ष उभारले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संत तुकाराममहाराजांच्या पालखीचे पाटील इस्टेट इथे आगमन झाले. संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीचे चाक पंक्चर झाल्याने त्यांना येण्यास दोन तासांचा विलंब झाला. पाटील इस्टेट येथील चौकात रात्री पावणेआठच्या सुमारास ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीचे आगमन झाले. महापौर प्रशांत जगताप, खासदार अनिल शिरोळे, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, नगरसेविका आशा साने, सुनंदा गडाळे, नंदा लोणकर, रेश्मा भोसले यांनी पालखीचे स्वागत केले. महापौरांनी संत तुकाराममहाराजांच्या पालखीरथामध्ये चढून काही वेळ रथाचे सारथ्य करून पालखीचे स्वागत केले. पालख्यांचे आगमन झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांची मोठी झुंबड उडाली. चौकात दोरीने फुलांच्या करंड्या बांधण्यात आल्या होत्या, पालखी चौकात येताच या करंड्यांमधील फुलांचा वर्षाव करण्यात आला. ‘बोला पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव-तुकाराम, ज्ञानोबा माऊली.. माऊली’ असा एकच जयघोष या वेळी झाला. स्वागताचे अत्यंत मनोहारी दृश्य या वेळी पाहायला मिळाले. ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीला विलंब झाल्याने वेगाने ती पुढे मार्गस्थ झाली.पालख्यांचे स्वागत करताना प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘पुणेकर कित्येक दिवसांपासून वाट पाहत असलेल्या पालख्यांचे आज आगमन झाले आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुणेकर आसुसलेले आहेत. दोन दिवस त्यांचा मुक्काम पुण्यात असेल. या काळात पुणेकर वारकऱ्यांच्या सेवेत कुठेही कमी पडणार नाहीत. त्यांच्या आगमनाने पावसाचा वर्षाव व्हावा, असे पांडुरंगाला साकडे आहे.’’पाटील इस्टेट येथे महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कक्षामध्ये वीणाधारी वारकऱ्यांना श्रीफल देऊन त्यांचे स्वागत केले जात होते. कक्षातील स्पीकर भक्तिगीते लावण्यात आली होती.वरुणराजाने लावली हुरहुरशहरात पालख्यांचे आगमन होताना त्यांचे स्वागत करायला वरुणराजा हमखास येत असतो. यंदा जून संपत आला तरी अजून पुरेसा पाऊस झालेला नाही; त्यामुळे पेरण्या न करताच अनेक शेतकरी वारीत सहभागी झाले आहेत. पुण्यामध्ये प्रवेश करीत असताना दर वर्षी न चुकता येणारा पाऊस यंदा न आल्याने वारकऱ्यांना मोठी हुरहुर लागल्याची भावना त्यांनी बोलून दाखविली.