शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणामुळे महिला आव्हाने पेलण्यास सक्षम : वैशाली नागवडे

By admin | Updated: March 25, 2017 03:38 IST

‘ जागतिक पातळीवर महिला दिन हा आठ मार्च म्हणून साजरा केला जात असला, तरी आपल्याकडे प्रत्येक घरात महिलाराज केव्हाच आले आहे.

नीरा : ‘ जागतिक पातळीवर महिला दिन हा आठ मार्च म्हणून साजरा केला जात असला, तरी आपल्याकडे प्रत्येक घरात महिलाराज केव्हाच आले आहे. पुरुषप्रधान संस्कृती असली, तरी घरातील सर्व जबाबदाऱ्या महिला उत्तम पद्धतीने पार पाडताना दिसत आहेत. महिला आरक्षणामुळे घराबाहेरील आव्हानेही आता महिला सक्षमपणे पेलताना दिसत आहेत,’ असे प्रतिपादन जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी व्यक्त केले. नीरा (ता. पुरंदर) येथील नीरामाई महिला मंडळाच्या वतीने बुधवारी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात नागवडे बोलत होत्या. यावेळी सिनेअभिनेत्री स्मिता ओक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका वर्षा शिवले, नीरेच्या सरपंच दिव्या पवार, माजी सरपंच सुहासिनी चव्हाण, मंडळाच्या अध्यक्षा व माजी महिला बालकल्याण सभापती रेखाताई चव्हाण यांसह मंडळातील सर्व सदस्या उपस्थित होत्या. नीरेतील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. नलिनी विजयकुमार शहा आदर्श माता, संजीवनी खंडेराव निकम आदर्श शिक्षिका, डॉ.रोहिणी संदीप मदने आदर्श वैद्यकीय सेवा, संगीता काशिनाथ पवार आदर्श महिला, शांताबाई बबनराव झगडे आदर्श लघूउद्योजिका, वैजयंती सुरेश जेधे यांना आदर्श गृहिणी पुरस्कार देण्यात आले. पुरस्कार देताना प्रत्येक महिलेच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आले होते. मंडळातील सदस्यांपैकी चंदा लाहोटी व मीना निगडे यांना बेस्ट आॅफ ग्रुप म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी धावपळीच्या धकाधकीच्या जीवनात महिलांनी करमणुकीसाठी ‘नजराणा हास्याचा’ हा स्मिता ओक व दिलीप हल्याळ यांच्या द्विपात्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती रेखा चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन तनुजा शहा यांनी केले, तर नेहा शहा यांनी आभार मानले.