वडगाव मावळ : येथे पोटोबामहाराज प्रांगणात सुरू असलेल्या मावळ फेस्टिव्हल कार्यक्रमादरम्यान चक्कर येऊन १७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. वडगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मावळ फेस्टिव्हलचे संस्थापक प्रवीण चव्हाण (वय ४१, रा. चव्हाणनगर, वडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मावळ फेस्टिव्हलचा शुक्रवारी रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम चालू असताना कार्यक्रमातील कलाकारांनी चव्हाण यांना रंगमंचाच्या पाठीमागे एक तरुण पडला असल्याची माहिती दिली. चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत रंगमंचाच्या मागे जाऊन पाहणी केली. (वार्ताहर)
वडगावात चक्कर येऊन युवकाचा मृत्यू
By admin | Updated: December 26, 2016 03:26 IST