शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

लस सर्वांना परवडणार, सहज मिळणारही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 04:05 IST

पुणे : “लसीचे वितरण कुठे आणि कसे होणार याबाबत सरकारशी चर्चा सुरू आहे. सर्वांना परवडेल आणि सहज उपलब्ध होईल, ...

पुणे : “लसीचे वितरण कुठे आणि कसे होणार याबाबत सरकारशी चर्चा सुरू आहे. सर्वांना परवडेल आणि सहज उपलब्ध होईल, असा दर सरकारला कळविण्यात आला आहे. त्यादृष्टीने आमची तयारी सुरू आहे. उत्पादन सातत्याने सुरू असल्याने लस वितरणामध्ये विलंब होणार नाही. दोन आठवड्यांनी मान्यता मिळाल्यास त्यादृष्टीने वितरण व डोसच्या संख्येत वाढ केली जाईल,” असे आदर पुनावाला यांनी सांगितले.

कोविशिल्ड लसीच्या चाचणीमध्ये परिणामकारकेतवर शिक्कामोर्तब झाले आहे. या लसीमुळे स्वयंसेवकांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण शून्य आहे. लस टोचल्यानंतर संबंधित व्यक्तींची प्रतिकारशक्ती वाढत असून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता ६० टक्क्यांनी कमी झाल्याचेही पुनावाला म्हणाले.

पंतप्रधानांना लसींबाबत आधीपासूनच खुप माहिती होती. त्यामुळे आम्हालाच आश्चर्य वाटले. त्यामुळे फार माहिती त्यांना द्यावी लागली नाही, असे पुनावाला म्हणाले. लसीचे वितरण, नियमन ही पुढील आव्हाने असतील. कमीत कमी वेळात आतापर्यंत झालेल्या उत्पादनाची त्यांनी प्रशंसा केली. आम्ही उत्पादन वाढविण्यासाठी उभा केलेला तिसरा प्रकल्पही पंतप्रधानांनी पाहिला. या प्रकल्पामुळे वर्षभरात अब्जावधी डोस तयार होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

चौकट

लस वाहतुकीसाठी सुविधा उपलब्ध

कोविशिल्ड आणि कोव्होव्हॅक्स या दोन्ही लसींची साठवणुक व वाहतुक २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात करता येईल. त्यादृष्टीने भारताकडे पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. तर उणे २० पर्यंत साठवणुकीसाठी खुप कमी तर उणे ७० अंशासाठी काहीच सुविधा नाहीत. यावरूनच पुढील काही महिन्यांत येणाऱ्या लसींबाबत साठवणुकीचा अंदाज बांधता येईल. अ‍ॅस्ट्रॉझेनेका लसीच्या तुलनेत नोव्हावॅक्स लसीची प्रक्रिया सुमारे दोन महिने मागे आहे. कोविशिल्डनंतर या लसीच्या चाचण्या सुरू झाल्या. तर कोडेजेनिक्सची पहिल्या टप्प्यातील चाचणी डिसेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये सुरू होणार असल्याने या लसीला आणखी एक वर्ष लागेल, असे आदर पुनावाला यांनी स्पष्ट केले.

चौकट

पंतप्रधानांचे ट्वीट

“सिरम संस्थेच्या टीमशी चांगला संवाद झाला. आतापर्यंतची लस निर्मितीतील प्रगती आणि भविष्यातील उत्पादन क्षमतेवर त्यांनी सखोल माहिती दिली. उत्पादन प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करता आली.” - नरेंद्र मोदी

----------