शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

लस सुरक्षित व रोगप्रतिकारकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:11 IST

लोकमत न्युज नेटवर्क पुणे : कोविशिल्ड ही कोरोनावरील लस असुरक्षित असल्याचा चेन्नई येथील एका स्वयंसेवकाने केलेला धक्कादायक आरोप सिरम ...

लोकमत न्युज नेटवर्क

पुणे : कोविशिल्ड ही कोरोनावरील लस असुरक्षित असल्याचा चेन्नई येथील एका स्वयंसेवकाने केलेला धक्कादायक आरोप सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने फेटाळून लावला आहे. ही लस सुरक्षित आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविणारी असल्याचा खुलासा संस्थेने केला आहे. संबंधित स्वयंसेवकाला कायदेशीर नोटीस पाठवण्याचाही इशारा संस्थेने दिला आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठ व अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीने विकसित केलेल्या कोविशिल्ड या लसीच्या भारतातील मानवी चाचण्या सिरम इन्स्टिट्युटमार्फत सुरू आहेत. तसेच या लसीचे उत्पादनही सिरमकडून सुरू करण्यात आले आहे. चेन्नई येथील एका ४० वर्षीय स्वयंसेवकाच्या पत्नीने ही लसीमुळे मेंदुविषयक समस्या निर्माण झाल्याचा आरोप करून कायदेशीर नोटीस बजावली आहे. तसेच लसीची चाचणी व उत्पादन थांबविण्यासह पाच कोटी रुपयांची नुकसान भरपाईही मागितली आहे. ‘सिरम’ने हे आरोप फेटाळले असून त्याबाबतचा खुलासा मंगळवारी (दि. १) केला.

‘कोविशिल्ड लस सुरक्षित व रोगप्रतिकारक आहे. चेन्नईच्या स्वयंसेवकासोबत घडलेली घटना दुर्दैवी आहे. पण लसीमुळे हा प्रकार झालेला नाही. त्यांच्या वैद्यकीय स्थितीबद्दल सहानुभुती आहे. चाचणीसाठी सर्व आवश्यक नियम, नैतिक प्रक्रिया आणि नियमावलींचे काटेकोरपणे पालन करण्यात आले आहे. ही घटना लसीच्या चाचणीशी संबंधित नसल्याचे संबंधित नियामक संस्थांनी स्पष्ट केले आहे.

या घटनेशी संबंधित सर्व माहिती भारतीय औषध महानियंत्रकांनाही दिली आहे. आवश्यक प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर चाचण्या सुरू ठेवल्या आहेत. लस पुर्णपणे सुरक्षित व रोगप्रतिकारक असल्याचे सिध्द झाल्याशिवाय मोठ्या प्रमाणावर वापरासाठी दिली जाणार नाही, याची खात्री देतो. स्वयंसेवकाचे आरोप कंपनीच्या प्रतिष्ठेला हानी पोहचविणारे असल्याने कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे,’ असे सिरमककडून स्पष्ट करण्यात आले आहे.

-------------