या पार्श्वभूमीवर चिंचोशी येथे पशुसंवर्धन विभागाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. संपूर्ण तालुक्यात मागणीनुसार जनावरांना लाळ खुरकत रोगावर प्रतिबंधात्मक लस टोचली जाणार आहे. तसेच जनावरांच्या विषाणूजन्य रोगाबाबत मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. एकंदरीतच लसीकरणास सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
लसीकरण प्रारंभ प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्रीनाथ लांडे, पशुवैद्यकीय अधिकारी बजरंग नेटके, डाॅ. जोंधळे, सुनील बायखोर, मारुती गोकुळे, लहू गोकुळे, आबा कानडे, मयूर गोकुळे, पिंटू गोकुळे, हनू गोकुळे, बिरबल भोसकर, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
१८ शेलपिंपळगाव
चिंचोशी (ता. खेड) येथे जनावरांना लसीकरण करताना पशुवैद्यकीय टीम.