शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पंधरा ठिकाणी लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्र सरकारने घोषणा केल्याप्रमाणे पुणे शहरातही १६ जानेवारी रोजी पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना कोरोनावरील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केंद्र सरकारने घोषणा केल्याप्रमाणे पुणे शहरातही १६ जानेवारी रोजी पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना कोरोनावरील लस देण्यात येणार आहे़ याकरिता पुणे महापालिकेने १५ ठिकाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़ मात्र पहिल्या टप्प्यात १६ जानेवारीला प्रत्यक्षात किती जणांना लस दिली जाईल हे महापालिकेकडे उपलब्ध होणाºया लसवर अवलंबून आहे़

पुणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ़आशिष भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनावरील कोरोनावरील लसीकरणासाठी पुणे महापालिकेने पहिल्या टप्प्यापासून चौथ्या टप्प्यापर्यंतचे आवश्यक तयारी पूर्ण केली आहे़ सर्व टप्प्यातील लसीकरणासाठी शहरात साधारणत: २ हजार ९७ लसीकरण बूथ उभारले जाणार आहेत़ याव्दारे शहरातील सुमारे ४० लाख ३९ हजार ५९९ नागरिकांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे़

१६ जानेवारी रोजी १५ क्षेत्रिय कार्यालयनिहाय लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली असून, याकरिता खाजगी, महापालिकेची रूग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड करण्यात आली आहे़ ९९ बूथव्दारे होणाºया या लसीकरणात एका दिवशी एका बूथवर शंभर जणांना लस दिली जाणार आहे़

पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना लस दिली जाणार असल्याने, महापालिकेकडे नोंद केलेल्या ५२ हजार ७०२ जणांना आठ दिवसात लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ यात महापालिकेतील ११ हजार ७४ आरोग्य सेवक तर खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील ४१ हजार ६२८ जणांची नोंदणी झाली आहे़ या सर्व जणांना लस दोन टप्प्यात देण्यात येणार असल्याने वेस्टेज १० टक्के अधिकचा आकडा धरून महापालिकेला १ लाख १५ हजार ८२५ लसीचे डोसची आवश्यकता आहे़

--------------------------------

गरज पडली तर जम्बो हॉस्पिटल

पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयनिहाय १५ ठिकाणी लसीकरणची व्यवस्था करण्यात आली आहे़ लसीकरणाचे नियोजन हे पूर्णत: किती प्रमाणात लस उपलब्ध होते यावर अवलंबून आहे़ त्यामुळे लसीची मुलबक उपलब्धता झाल्यास, लसीकरणासाठी गरज पडल्यास शिवाजीनगर येथील जम्बो हॉस्पिटलचाही वापर केला जाणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले़

--------------------------------------------------