शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सुट्ट्या पैशांअभावी फळविक्रीवर संक्रांत

By admin | Updated: November 14, 2016 02:19 IST

चलनातून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्याचा फटका फळबाजाराला मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील

पुुणे : चलनातून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्याचा फटका फळबाजाराला मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील फळ विभागातील काही व्यापाऱ्यांनी सोमवारपासून थेट व्यापार बंद ठेवण्याची भूमिका घेतली आहे. तर ग्राहकांअभावी माल पडून राहत असल्याने अनेक व्यापाऱ्यांनी नवीन मालाची खरेदी थांबविली आहे.मागीच पाच दिवसांपासून सुट्ट्या पैशांअभावी फळबाजारातील उलाढाल मंदावली आहे. सध्या डाळिंब, सीताफऴ, संत्रा, मोसंबी आदी फळ उत्पादक मोठ्या शेतकऱ्यांकडून बाजारात मोठ्या प्रमाणात फळांची आवक होत आहेत. बाजारात सुट्टे पैसे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने सुरुवातीला शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आडत्यांनी खरेदीदारांकडून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा घेतल्या. मात्र, शेतकरी या नोटा स्वीकारण्यास तयार नाहीत. मात्र, दररोज लाखोंची उलाढाल होत असल्याने या जुन्या लाखो रूपयांच्या नोटांचे काय करायचे काय, असा प्रश्न आडत्यांना पडला आहे. तर दुसरीकडे उधारीचे प्रमाण वाढत चालले आहे. फळबाजारात तुलनेने ५०० व हजार रुपयांच्या पटीत व्यवहार जास्त प्रमाणात होतात. आता हे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. मालाची विक्री होत नसल्याने काही व्यापाऱ्यांनी नवीन मालाची खरेदी थांबविली आहे.मालाची विक्री होत नसल्याने सोमवारपासून शेतकऱ्यांना बाजारात फळे न आणण्याचा सल्ला दिला आहे. खरेदीदारांकडून ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा दिल्या जात आहेत. या नोटा पुढे शेतकरी घेत नाहीत. त्यामुळे व्यापाराला मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे सोमवारपासून व्यापार काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे एका फळ व्यापाऱ्याने सांगितले.