शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

स्वर महोत्सव आजपासून

By admin | Updated: December 10, 2015 01:39 IST

गायन, वादन आणि नृत्याचा संगम असलेल्या ६३व्या सवाई गंधर्व-भीमसेन महोत्सवाला आजपासून (दि. १०) सुरुवात होत आहे.

पुणे : गायन, वादन आणि नृत्याचा संगम असलेल्या ६३व्या सवाई गंधर्व-भीमसेन महोत्सवाला आजपासून (दि. १०) सुरुवात होत आहे. प्रसिद्ध गायक पं. राजन-साजन मिश्रा, पं. जसराज, पं. उल्हास कशाळकर, मालिनी राजूरकर यासारख्या संगीतातील दिग्गज शिरोमणींसह सावनी कुलकर्णी, शिल्पा पुणतांबेकर, सुचिस्मिता दास, अमजद अली, भारती प्रताप या नव्या पिढीतील सात कलाविष्कारांचा सुरेल संगम यंदाच्या महोत्सवात रसिकांना अनुभवायला मिळेल. आर्यसंगीत प्रसारक मंडळ आयोजित महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची (दि. १०) सुरुवात पुण्याच्या नम्रता गायकवाड हिच्या सनईवादनाने होणार आहे. त्यानंतर गायक पं. भास्करबुवा बखले यांच्या परंपरेतील सावनी कुलकर्णी आणि शिल्पा पुणतांबेकर यांचे सहगायन रसिकांना ऐकता येणार आहे. किराणा घराण्याचे पं. विश्वनाथ यांचे गायन तसेच मल्हार कुलकर्णी यांचे शिष्य रूपक कुलकर्णी व प्रवीण शेवलीकर यांच्या बासरी व व्हायोलिन सहवादनानंतर ख्यातनाम गायक पं. राजन-साजन मिश्रा यांच्या गायनाने उत्तरार्धाची सांगता होईल. पतियाला घराण्याच्या गायिका सुचिस्मिता दास या युवा कलाकाराच्या गायनाने दुसऱ्या दिवसाचा (दि. ११) प्रारंभ होईल. तिसऱ्या दिवसाची सुरुवात आग्रा घराण्याच्या गायिका भारती प्रताप यांच्या गायनाने होणार आहे. तसेच जयपूर घराण्याचे रघुनंदन पणशीकर यांचे गायन, प्रवीण गोडखिंडी यांचे बासरीवादन होणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ नर्तक व दुर्गालाल यांच्या परंपरेतील राजेंद्र गंगाणी यांचा कथक नृत्याविष्कार रसिकांना अनुभवता येईल. ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्रा अशा तिन्ही घराण्यांचे प्रतिनिधित्व करणारे गजानन बुवा यांचे शिष्य पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने उत्तरार्धाची समाप्ती होईल. महोत्सवाचा शेवटचा दिवस सकाळ आणि सायंकाळ अशा दोन सत्रात रंगणार आहे. सकाळच्या सत्रात पं. शौनक अभिषेकी यांचे गायन, ध्रुव घोष यांचे सारंगीवादन होईल. ज्येष्ठ गायिका मालिनी राजूरकर यांची अभिजात गायकी रसिकांना अनुभवायला मिळेल. सायंकाळच्या सत्राची सुरुवात नानासाहेब देशपांडे यांच्या नातसून पद्मा देशपांडे यांच्या गायनाने होणार आहे. परंपरेप्रमाणे महोत्सवाचा समारोप किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने होईल. (प्रतिनिधी)