शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिकाला धमकाविण्यासाठी रिव्हॉल्व्हरचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:13 IST

पुणे : व्यावसायिकाकडून ३ कोटी रुपयांची जमीन नावावर करून घेतल्यानंतर, आणखी ५८ गुंठे जमीन बळकाविण्यासाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची ...

पुणे : व्यावसायिकाकडून ३ कोटी रुपयांची जमीन नावावर करून घेतल्यानंतर, आणखी ५८ गुंठे जमीन बळकाविण्यासाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे. हाताने मारहाण करणे आणि रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून धमकाविल्याच्या प्रकरणात अ‍ॅड. दीप्ती काळेच्या साथीदाराला फरासखाना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

नितीन मनोहर हनमे (वय ३१, रा. संतोषनगर, कात्रज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दीप्ती काळे, नीलेश शेलार आणि आणखी दोघांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील मुख्य आरोपी अ‍ॅड. दीप्ती काळे हिचा मंगळवारी दुपारी ससून रुग्णालयातील ८ व्या मजल्यावरील खिडकीतून पळून जाताना खाली पडून मृत्यू झाला होता.

बांधकाम व्यावसायिकाशी जवळीक साधून त्याला व्यवसायासाठी ३५ लाख रुपये या टोळीने दिले होते. त्याबदल्यात मरकळ येथील ४२ गुंठे जमीन दीप्ती काळे हिच्या नावावर करून घेतली होती. उरलेली ५८ गुंठे जमीन नावावर करून देण्यासाठी या बांधकाम व्यावसायिकाला धमकी दिली जात होती. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी नितीन हनमे याला अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले होते. सरकारी वकील किरण बेंडभर यांनी सांगितले की, हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. फरार असलेल्या इतर दोन आरोपींचा शोध घ्यायचा आहे. या गुन्ह्यात आरोपींनी रिव्हॉल्व्हरचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. ते जप्त करायचे आहे. गुन्हा करण्यासाठी हनमे याला किती रक्कम मिळाली, हा व्यवहार कशाप्रकारे झाला, याचा तपास करण्यासाठी ७ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी अ‍ॅड बेंडभर यांनी मागणी केली. न्यायालयाने ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.