चाकण : विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी ई-लर्निंग आवश्यक आहे. अशा प्रोजेक्टरचा उपयोग विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध करावा व गुणवत्ता सुधारावी, अशी अपेक्षा चाकण रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष नितीन पाटील यांनी व्यक्तकेली.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराबवाडी येथील विद्यार्थ्यांकरिता रोटरीचे नियोजित प्रांतपाल यांच्या जिल्हा निधीतून इ-लर्निंग प्रोजेक्ट प्रदान करण्यात आला. खराबवाडीच्या सरपंच योजना सोमवंशी, अनुराधा कड, चाकण रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप बागडे, माजी उपसरपंच माऊली सातव, बाळासाहेब शिळवणे, चंद्रकांत गोरे, सुधीर काकडे, अनिता जंबुकर, संभाजी सोनवणे, दीपक कर्पे, डॉ. विजय भवारी, आदर्श शिक्षिका रोहिणी माशेरे, मुख्याध्यापक हरिभाऊ खोडदे उपस्थित होते.खराबवाडी प्राथमिक शाळेत राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करून पाटील म्हणाले, की सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. खराबवाडीबरोबरच आरूवस्ती येथील शाळेला हा प्रोजेक्ट प्रदान करण्यात आला. यापूर्वी रोटरी तर्फे चाकण पंचक्रोशीतील दहा शाळांना रोटरीच्या माध्यामातून व नितीन पाटील यांच्या प्रयत्नातून हा प्रोजेक्ट प्रदान करण्यात आला. संदीप बागडे यांची रोटरीच्या अध्यक्षपदी, तर दीपक कर्पे यांची सचिवपदी निवड झाल्याबद्दल सरपंच योजना सोमवंशी, माऊली सातव यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक हरिभाऊ खोडदे यांनी प्रास्ताविक केले. रोहिणी माशेरे यांनी सूत्रसंचालन केले.(वार्ताहर)
प्रोजेक्टरचा उपयोग नियोजनबद्ध करावा
By admin | Updated: July 13, 2015 23:51 IST