शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘प्री-कुकिंग’ ओल्या कचरा कंपोस्टिंगचा प्रयोग यशस्वी

By admin | Updated: September 22, 2014 05:26 IST

नागरिकांकडून ओला व सुका कचरा वेगळा करण्यास अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे

पुणे : नागरिकांकडून ओला व सुका कचरा वेगळा करण्यास अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. मात्र, ओल्या कचऱ्याचे दोन प्रकारे वर्गीकरण करून अन्न शिजविण्यापूर्वीच्या (प्री-कुकिंग) कचऱ्याचे कंपोस्टिंग करण्याचा यशस्वी प्रयोग तळजाई येथे करण्यात आला आहे. आद्या इन्व्हायर्नमेंट व वॉर्ड वेस्ट मॅनेजमेंट या सोशल ग्रुपने पी-कुकिंगचा प्रकल्प महापालिकेचे सहआयुक्त सुरेश जगताप यांच्याकडे नुकताच सुपूर्त केला. शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून प्रक्रिया प्रकल्प व बायोगॅस उभारण्यात आले. परंतु, हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. तसेच, ओला व सुका कचरा वर्गीकरणाकडे नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. या परिस्थितीतही ओल्या कचऱ्यामधून प्री-कुकिंगचा कचरा वेगळा करून कंपोस्टिंगचा प्रयोग तळजाई येथे करण्यात आला आहे. स्थानिक नगरसेवक सुभाष जगताप व सहआयुक्त सुरेश जगताप यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. सहकारनगर परिसरातील सर्व हॉटेल, स्नॅक सेंटर, चौपाटी, पथारी व मंगल कार्यालयातून अन्न शिजविण्यापूर्वी तयार होणारा प्री-कुकिंगचा कचरा गोळा केला जात आहे. साधारण ४०० किलो प्री-कुकिंग ओल्या पदार्थांचे केवळ २१८ चौरस फूट जागेत कंपोस्टिंग करता येणार आहे. आद्या एन्व्हॉयर्नमेंटचे इंद्रजित कर्वे, वॉर्ड वेस्ट मॅनेजमेंट या सोशल ग्रुपच्या मनीषा दाते, विभा खानापूरकर, ऊर्मिला डाबी, स्वाती कुलकर्णी व निशिगंधा पदमवार यांनी प्री-कुकिंग ओल्या कचऱ्याचे कंपोस्टिंग करण्याचा यशस्वी प्रयोग केला. हा प्रकल्प चालविण्याची जबाबदारी महापालिकेचे सूरज कुचेकर व प्रकाश कांबळे यांनी घेतली आहे, असे सुरेश जगताप यांनी सांगितले.(प्रतिनिधी)