शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतागृहांसाठी जेट यंत्राचा वापर

By admin | Updated: June 25, 2016 00:57 IST

स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी यापुढे जेट यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. जास्त कचरा साठणारी शहरातील २०० ठिकाणे निश्चित करण्यात आली असून,

पुणे : स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी यापुढे जेट यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. जास्त कचरा साठणारी शहरातील २०० ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, तेथील कचरा नियमितपणे उचलला जावा यासाठी कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्याचे काटेकोर पालन केले जाईल, असे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने बैठकीत सांगण्यात आले.महापौर प्रशांत जगताप व खासदार वंदना चव्हाण यांनी पालिकेच्या घनकचरा विभागाला शहरातील कचऱ्याच्या संदर्भात बैठक घेण्यास सांगितले होते. त्यानुसार झालेल्या बैठकीत शहरातील कचरा समस्येचा आढावा घेण्यात आला. महापौर जगताप, खासदार वंदना चव्हाण, पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप, क्षेत्रीय अधिकारी माधव जगताप तसेच अन्य अधिकारी बैठकीला उपस्थित होते.खासदार चव्हाण यांनी या वेळी अनेक सूचना केल्या. त्या म्हणाल्या, ‘‘कचरा कुंडीत टाकणार नाहीत त्यांच्यावर पालिकेने दंडात्मक कारवाई करावी. सार्वजनिक ठिकाणी कचरा करू नये यासाठी पालिकेच्या वतीने प्रबोधन केले जात नाही. लोकजागृतीसाठी विशेष उपक्रम आयोजित केले जावेत. सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेकडेही पालिकेचे लक्ष नसते. यासाठी खासगी उद्योगांचे सहकार्य घ्यावे.’’घनकचरा विभागाचे प्रमुख जगताप यांनी माहिती दिली. जास्त कचरा साठणाऱ्या २०० ठिकाणी जास्त लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक स्वच्छतागृहे दत्तक घेण्यासाठी काही उद्योगांनी होकार दिला आहे. दरम्यान, पालिकेकडून क्षेत्रीय कार्यालयांना यासाठी जेट यंत्र उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.