शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

इच्छुकांच्या कार्यक्रमात काळ्या पैशाचा वापर

By admin | Updated: January 10, 2017 03:23 IST

महापालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून तयार ठेवलेला काळा पैसा नोटाबंदीच्या निर्णयानंतर इच्छुक उमेदवारांनी प्रभागातील महिला बचत गट

पिंपरी : महापालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून तयार ठेवलेला काळा पैसा नोटाबंदीच्या निर्णयानंतर इच्छुक उमेदवारांनी प्रभागातील महिला बचत गट, मंडळाचे पदाधिकारी, सदस्य यांच्या नावे जवळच्या सहकारी बँकांमध्ये जमा केला. शेकडो बँक खाती नव्याने उघडली. त्या खात्यांतील रक्कम आता निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांसाठी वापरली जात आहे. बँका, एटीएममधून रक्कम काढण्यास मर्यादा असताना नगरसेवक, इच्छुक उमेदवारांना प्रभागातील कार्यक्रमांवर खर्च करण्यासाठी मोठ्या रकमा कोठून उपलब्ध होतात? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास काही दिवसांचा अवधी उरला आहे. आचारसंहिता लागू झाल्यांनतर प्रचारावर केलेल्या खर्चाचा हिशेब द्यावा लागणार आहे. त्यामुळे आचारसंहितेपूर्वीच इच्छुकांची कार्यक़्रमांच्या आयोजनावर मुक्तहस्ते उधळण सुरू आहे. कोणी प्रभागातील नागरिकांना देवदर्शन घडविण्यासाठी १० ते १५ बसगाड्या उपलब्ध करून देत आहे, तर कोणी महिलांसाठी कार्यक़्रमांचे आयोजन करून लोखोंची बक्षिसे वाटू लागले आहेत. अपेक्षित रक्कम काढता येइर््ल, अशी अद्यापही बँकांमध्ये परिस्थिती नाही. बँकांमध्ये खडखडाट आहे. पाचशे, हजाराच्या जुन्या नोटा चलनातूनबाद झाल्या आहेत. प्रत्येक व्यवहारासाठी नव्याच नोटा वापराव्या लागत आहेत. नव्या नोटांची कमतरता जाणवत असताना, लाखोंचे नव्या नोटांचे बंडल वाहनांमधून घेऊन जाणाऱ्यांना पोलिसांना पकडले. त्यांची चौकशी झाली; परंतु प्रभागांमध्ये सुरू असलेली फ्लेक्सबाजी, रोज होणारे कार्यक्रम यासाठी नव्या नोटा उपलब्ध कशा होतात? याचा शोध घेतल्यास नोटाबंदी वेळी दुसऱ्यांच्या नावे जमा केलेली रक्कमच विविध कार्यक्रमांसाठी काढून आणली जात आहे.(प्रतिनिधी)नोटाबंदीनंतर नवीन ४०० खाती पिंपरीतील दोन सहकारी बँकांत नोटाबंदीनंतर सुमारे ४०० खातेदारांनी खाती उघडली. काही इच्छुकांनी त्यांच्या नावे विशिष्ट रक्कम बँकेत जमा केली होती. रक्कम जमा करते वेळीच त्यांच्याकडून बँकेच्या स्लीपवर सह्या घेऊन ठेवल्या होत्या. त्याचा उपयोग करून घेतला जात आहे. तीन ते चार नव्या खातेदारांच्या नावावरील रक्कम एकाच वेळी काढल्यास कार्यक्रमासाठी ती खर्च करण्यास सहज उपलब्ध होत आहे. नोटाबंदीमुळे लपवलेला काळा पैसाच निवडणूक प्रचारात खर्चासाठी वापरला जात आहे. त्यामुळे इच्छुकांना कधीच नोटांची टंचाई भासत नसल्याचे दिसून येत आहे.