उरुळीकांचन : उरी येथील मुख्य लष्करी तळावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ उरुळीकांचन (ता. हवेली) येथील शिवसेना शहर शाखेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मंगळवारी (ता. २०) निषेध मोर्चा काढण्यात आला. तळवाडी येथील शैलजा हॉटेल चौक परिसरात आयोजित मोर्चाच्या वेळी दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधी घोषणा देऊन पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाचे दहन करण्यात आले.या वेळी पंचायत समिती सदस्य काळुराम मेमाणे, शिवसेनेचे तालुका समन्वयक बाळासाहेब कांचन, तालुका उपप्रमुख विजय बगाडे, ग्राहक कक्षाचे राजेंद्र बोरकर, विभागप्रमुख श्रीकांत मेमाणे, सचिन कांचन, विजय मुरकुटे, विकास जगताप, आबासाहेब चव्हाण, अतुल मोरे, मुन्ना शेख, निखिल खेडेकर, शिवाजी ननवरे उपस्थित होते.
उरी दहशतवादी हल्ल्याचा निषेध
By admin | Updated: September 26, 2016 01:29 IST