पुणे : उर्दू ही परकीय किंवा मुसलमानांची भाषा नसून ती अस्सल भारतीय भाषा आहे. तिचा जन्म मराठवाड्यात पर्यायाने महाराष्ट्रात झाला आहे. उर्दू आणि मराठीमध्ये सेतू बांधण्याचे मौलिक कार्य ‘हो जिसकी जुबाँ उर्दू की तरह’ या पुस्तकाने केले आहे, असा निर्वाळा ज्येष्ठ समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी दिली. प्रा. विश्वास वसेकर यांनी लिहिलेल्या ‘हो जिसकी जुबाँ उर्दू की तरह’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. कात्तापल्ले यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. अविनाश सांगोलेकर अध्यक्षस्थानी होते. डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, की उर्दू कवितेचे केवळ रसग्रहण किंवा रसास्वाद असे मर्यादित स्वरूप या पुस्तकाचे नसून गुलजारसारख्या महत्त्वाच्या कवीच्या कवितेची मौलिक समीक्षा प्रथमच या ग्रंथाद्वारे होत आहे.उर्दू साहित्यासंबंधी मराठी भाषकांचे जे ज्ञान आहे त्यात वसेकरांनी मोलाची भर टाकल्याचे डॉ. सांगोलेकर यांनी सांगितले. डॉ. अजीज नदाफ, डॉ. शेख इक्बाल मिन्ने, जनार्दन म्हात्रे, डॉ. दीपक कासराळीकर, शाहीर सुरेशकुमार वैराळे यांनी लेखनाचे कौतुक केले. विजय लेले यांनी प्रास्ताविक केले. सुरेश पाटोळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
उर्दूू ही अस्सल भारतीय भाषा
By admin | Updated: January 25, 2017 02:16 IST