शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

यूपीएससीच्या विद्यार्थ्यांनी उलगडली यशोगाथा

By admin | Updated: June 3, 2017 02:53 IST

यूपीएससी परीक्षा म्हणजे कसोटी क्रिकेट आहे, इथं यश अपयशात टिकून राहणं महत्त्वाचं ठरतं... प्रशासकीय अधिकारी का व्हायचंय, हे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : यूपीएससी परीक्षा म्हणजे कसोटी क्रिकेट आहे, इथं यश अपयशात टिकून राहणं महत्त्वाचं ठरतं... प्रशासकीय अधिकारी का व्हायचंय, हे एकदा पक्कं ठरवून मगच यूपीएससी परीक्षेला सुरुवात करा... हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क यांचा मेळ घाला... आयएएस बनून जिल्हयाचा प्रमुख बनणं यासारखं दुसरं यश असूच शकत नाही, त्यामुळे कसून तयारी करा, असे कानमंत्र देत यूपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांची शुक्रवारी यशोगाथा उलगडली.द युनिक अ‍ॅकॅडमीच्या वतीने यूपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन गणेश कला, क्रीडा मंदिर येथे करण्यात आले होते. या वेळी महापालिकेच्या अतिरिक्त आयक्त शीतल उगले या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. युनिक अ‍ॅकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव, मल्हार पाटील, भूषण देशमुख, प्रवीण चव्हाण, मनोहर भोळे, मंगेश खराटे, अमर जगताप या वेळी उपस्थित होते. यूपीएससी परीक्षेकडे का वळलो, त्याचा अभ्यास कसा केला, त्यासाठी काय संघर्ष करावा लागला, प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात करीत कसे यशस्वी ठरलो आदी विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनोगतातून मांडले. यूपीएससीमध्ये राज्यातून पहिली आलेली विश्वांजली गायकवाड म्हणाली, ‘‘तुम्हाला यूपीएससी परीक्षा का करायची आहे, ते पहिल्यांदा निश्चित करा. सगळं लिहून काढा, हवं तर कुणाला सांगू नका. मात्र तुम्ही हे का करताय, ते तुम्हाला पूर्णपणे स्पष्ट असलं पाहिजे. त्यानंतर आपण नाहक यामध्ये अडकलो नाही ना, असे वाटत नाही. यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करताना वेळेचे नियोजन करणं याला फार महत्त्व आहे. त्याचबरोबर लेखी परीक्षेमध्ये स्वत:ची मते मांडणे अपेक्षित असते.’’दिनेश गुरव म्हणाला, ‘‘इंजिनिअरिंग करत असतानाच यूपीएससी करायचे निश्चित केले होते. त्यानुसार परीक्षेच्या तयारीसाठी स्वत:ला झोकून दिले. दुसऱ्या प्रयत्नांमध्ये यश आले.’’किरण खरे म्हणाला, ‘‘आयएएस अधिकारीपदामध्ये सत्ता आहे. देशातला हा सर्वात बेस्ट जॉब आहे. त्यामुळे स्वत:ला ओळखून या परीक्षेची तयारी सुरू करावी.’’तुकाराम जाधव म्हणाले, ‘‘युनिकला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली. प्रत्येक वर्षी आम्ही यूपीएससीच्या निकालानंतर यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करतो. कारण प्रत्येक निकालानंतर वेगवेगळया सक्सेस स्टोरी पुढे येत असतात.’’या वेळी अजय पवार, यशवंत सोनवणे, गोरख भामरे, आशिष पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. महेश शिरापूरकर यांनी सूत्रसंचालन केले....हे म्हणजे यश असतंजळगावच्या आशिष पाटील याने त्याच्या मनोगतामध्ये धमाकेदार बॅटिंग केली. पुण्यात येऊन प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसा झगडा करीत यश मिळविलं ते त्याने सांगितलं. तो म्हणाला, ‘‘कालपर्यंत बसचे दोन रुपये तिकीट वाचविण्यासाठी कल्पना लढवायचो. एकेका रूममध्ये चार-पाच जण दाटीवाटीने राहायचो. साधा ७ रुपयांचा चहा जास्त पाणी घालून मिळाला तरी चरफडायचो. मात्र यूपीएसीच्या निकालानंतर रात्रीतून सारं चित्र बदलून गेलं. आज २० रुपयांचा महागडा चहा पिला तरी त्याचे फार वाईट वाटल नाही. हे म्हणजे यश असतं.’’