शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

सीएमडीं’चा अस्थिर झुला

By admin | Updated: April 12, 2015 00:26 IST

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी स्थापन केलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) गाडीला आठ वर्षांत पूर्णवेळ ‘चालक’च मिळालेला नाही.

पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी स्थापन केलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) गाडीला आठ वर्षांत पूर्णवेळ ‘चालक’च मिळालेला नाही. या काळात पीएमपीची धुरा खांद्यावर असलेले तब्बल १२ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) पुणेकरांनी पाहिले. कधी एक दिवस तर कधी चार महिन्यांसाठी भार खांद्यावर घेतलेल्या ‘सीएमडीं’चा अस्थिर झुला पीएमपीच्या सुधारणांना लटकवणारा ठरला आहे.पुणे व पिंपरी-चिंचवड पालिकांची स्वतंत्र सार्वजनिक वाहतूक सेवा २००७ मध्ये एकत्र करून ‘पीएमपी’ ही कंपनी स्थापन करण्यात आली. कंपनी तयार करताना कंपनीचे सर्वेसर्वा म्हणून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पद निर्माण करण्यात आले. या पदावर ‘आयएएस’ दर्जाचा अधिकारी नेमण्याचे निश्चित केले. त्यानुसार १९ आॅगस्ट २००७ रोजी सुब्बराव पाटील यांच्या रूपाने ‘पीएमपी’ला पहिले सीएमडी मिळाले. पाटील यांना काम करण्यासाठी सुमारे १३ महिन्यांचाच कालावधी मिळाला. मात्र, या काळातही त्यांनी पीएमपी सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्यानंतर अश्वनीकुमार यांच्यावर केवळ एकच दिवस हा भार सोपविण्यात आला. त्यांची बदली झाल्यानंतर पुन्हा पाटील यांना दीड महिन्याची तर त्यानंतर पुन्हा अश्वनीकुमार यांना तीन महिन्यांसाठी संधी देण्यात आली.‘सीएमडी’ बदलाची ही मोहीम राज्य शासनाने पुढेही नित्यनेमाने सुरूच ठेवली. मागील आठ वर्षांत तब्बल १२ अधिकारी बदलण्यात आले. खाडे यांच्यानंतर आर. एन. जोशी यांचा अपवाद वगळता सीएमडी म्हणून आलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर हा भार अतिरिक्त म्हणून सोपविण्यात आला. त्यांच्याकडे इतर विभागांची मुख्य जबाबदारी होती. त्यामध्ये महेश झगडे, शिरीष कारले, दिलीप बंड, राजीव जाधव, डॉ. श्रीकर परदेशी आणि काही दिवसांपूर्वीच आलेले ओमप्रकाश बकोरिया या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत केवळ जोशी यांनीच पूर्ण तीन वर्षे पीएमपी सांभाळली. मात्र, सुरुवातीपासून टप्प्याटप्याने नवीन अधिकारी मिळत गेल्याने पीएमपीच्या दुर्दशेला सुरुवात झाली. मागील दोन-तीन वर्षांत तर पीएमपीला जणू उतरती कळा लागली आहे. आतापर्यंत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकसुब्बराव पाटील (१९ आॅगस्ट २००७ ते २१ सप्टेंबर २००८), अश्वनीकुमार (२२ सप्टेंबर २००८ (एकच दिवस), सुब्बराव पाटील (२३ सप्टेबिंर ते ५ नोव्हेंबर २००८), अश्वनीकुमार (५ नोव्हेंबर २००८ ते ५ फेबु्रवारी २००९), नितीन खाडे (९ फेबु्रवारी ते २५ आॅगस्ट २००९), महेश झगडे (२५ आॅगस्ट ते ७ सप्टेंबर २००९ (अतिरिक्त पदभार), शिरीष कारले (७ सप्टेंबर २००९ ते २३ फेबु्रवारी २०१० (अतिरिक्त पदभार), दिलीप बंड (२३ फेब्रुवारी २०१० ते ३ जानेवारी २०११ (अतिरिक्त पदभार), आर. एन. जोशी (३ जानेवारी २०११ ते ३१ आॅक्टोबर २०१४), राजीव जाधव (१ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर २०१४ (अतिरिक्त पदभार), डॉ. श्रीकर परदेशी (१४ डिसेंबर २०१४ ते ४ एप्रिल २०१५ (अतिरिक्त पदभार)