शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांचे फुटले पेव

By admin | Updated: April 2, 2016 03:37 IST

विधानसभेत वीस दिवसांपूर्वी अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत घोषणा करण्यात आली. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने बांधकामे नियमितीकरणाबाबत घोषणा

पिंपरी : विधानसभेत वीस दिवसांपूर्वी अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत घोषणा करण्यात आली. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने बांधकामे नियमितीकरणाबाबत घोषणा केली असली, तरी त्याबाबतचा अध्यादेश निघालेला नाही. त्यामुळे हा मुद्दा अधांतरीच आहे. तर दुसरीकडे बांधकामे नियमित होणार, या अपेक्षेने अधिक वेगाने अनधिकृत बांधकामे रातोरात उभी राहत आहेत. शहरात सध्या अनधिकृत बांधकामांनी जोर धरला आहे. अनधिकृत बांधकामांबाबत दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडेही लक्ष लागले आहे. दरम्यान, अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाबाबत विधानसभेत झालेल्या घोषणेमुळे अनधिकृत बांधकामांनी पुन्हा जोर धरला आहे. अशा बांधकामांना संरक्षण मिळू शकते, अशी भावना निर्माण झाल्याने नागरिकही बिनधास्त असल्याचे दिसून येत आहे. यासह निवडणुका जवळ आल्याने अशी बांधकामे थांबविण्याबाबतची तत्परता राजकीय मंडळीही दाखवत नाहीत. अनेक दिवसांपासून अर्धवट असलेली तसेच नवीनही अनधिकृत बांधकामे रातोरात उभी राहत आहेत. या अगोदर अनधिकृत बांधकामावरील कारवाईची नागरिकांमध्ये भीती होती. विनापरवानगी बांधकाम करताना नागरिक हजार वेळा विचार करायचे, बांधकाम पाडल्यास लाखो रुपयांचे नुकसान होईल, या भीतीने अनधिकृत बांधकामांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, आता पुन्हा शहरात अनधिकृत बांधकामांनी जोर धरल्याचे दिसून येत आहे. महापालिका हद्दीत एकूण चार लाख २६ हजार २४१ मिळकती असून, त्यापैकी २००८नंतरची अनधिकृत बांधकामे ६५ हजार ६०६ आहेत. अनधिकृत बांधकामे केल्याप्रकरणी दोन हजार २८५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर, सुमारे २ हजार ३०० बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. यासह ३५ हजार बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाबाबत विधानसभेत घोषणा झालेली आहे. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तसेच कारवाई थांबविण्याबाबत शासनाकडूनही अद्याप आदेश प्राप्त झाले नसून, त्याबाबतचा अध्यादेशही निघालेला नाही. (प्रतिनिधी)विधानसभेत घोषणा, मात्र अद्यापही अध्यादेश नाहीपिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न अनेक वर्षांपासून लटकलेला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११ मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची घोषणा विधानसभेत केली. या घोषणेनंतर विविध राजकीय पक्षांसह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.या घोषणेमुळे अनधिकृत बांधकामधारकांना दिलासा मिळाला असल्याचेही बोलले गेले. यामुळे शहरातील हजारो अनधिकृत बांधकामधारकांना अभय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विधानसभेत घोषणा केली असली, तरी अद्याप त्याबाबतचा अध्यादेश काढण्यात आलेला नाही. त्यामुळे बांधकामे नियमित होणार की नाही, याबाबत अजूनही साशंकता आहे.