शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

अध्यासनांवर विद्यापीठाची नजर

By admin | Updated: May 7, 2014 04:19 IST

पुणे विद्यापीठातील अध्यासनांसाठी नियमावली घालून देण्यात येणार असून दरवर्षी त्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.

पुणे : पुणे विद्यापीठातील अध्यासने नेमकी काय करतात, असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातून अनेकदा उपस्थित केला जातो. त्यामुळेच यापुढे अध्यासनांसाठी नियमावली घालून देण्यात येणार असून, दरवर्षी त्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. अध्यासनांनी वर्षाला अहवाल सादर करण्याची सक्ती करण्यात येणार असून त्यावरील देखरेखीसाठी समिती नेमण्याचा निर्णय विद्यापीठाच्या आज झालेल्या व्यवस्थापन परिषदेत घेण्यात आला.पुणे विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, पंडित भीमसेन जोशी, शंतनुराव किर्लोस्कर यांच्यासह वीस महापुरूष आणि थोर व्यक्तीमत्वांच्या नावाने अध्यासने आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही अध्यासने स्थापन करण्यात आली. विद्यापीठ आणि समाज यांना जोडणारा महत्वाचा दुवा म्हणून अध्यासनांना महत्व प्राप्त झाले आहे. मात्र, याठिकाणी नेमके कोणते संशोधन होते, याविषयी अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. याबाबत आज व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये जोरदार चर्चा झाली. अखेर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार अध्यासनांचे कामकाज चालविण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.यासंदर्भात, प्रा. अरूण अडसूळ यांनी आज व्यवस्थापन परिषदेत अध्यासनांच्या कामांचा आढावा घेणारा अहवाल सादर केला. त्यावर चर्चा झाल्यानंतर नियमावली तयार करण्याचा निर्णय घेणत आला. त्यानुसार, अध्यासनांनी नियमावलीनुसार काम करावे, दरवर्षी विद्यापीठाला अहवाल सादर करावा, अध्यासनांमधील संशोधन प्रकाशित करावे अशा सूचना देण्यात आल्या. यापूर्वी अध्यासनांना कोणतीही नियमावली नव्हती. मात्र, या नियमावलीमुळे अध्यासनांच्या कामामध्ये सुसूत्रता देणार असून तसा अहवाल विद्यापीठापुढे द्यावा लागणार आहे.