शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाचाच ‘आविष्कार’

By admin | Updated: January 30, 2017 03:04 IST

विद्यार्थी व शिक्षकांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने घेतल्या जाणाऱ्या आविष्कार स्पर्धेवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी व शिक्षकांनी नवव्यांदा

पुणे : विद्यार्थी व शिक्षकांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने घेतल्या जाणाऱ्या आविष्कार स्पर्धेवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी व शिक्षकांनी नवव्यांदा आपले नाव कोरले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आयोजित ११ व्या ‘आविष्कार - २०१६’ स्पर्धेत पुणे विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. रविवारी पारितोषिक वितरण समारंभात विद्यापीठाने ११ परितोषिके मिळवली.नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात २७ ते २९ जानेवारी या कालावधीत आविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील १९ विद्यापीठाच्या ५६२ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. या सर्व विद्यार्थ्यांमधून ४८ विद्यार्थ्यांना बक्षिसे मिळाली. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्वात जास्त ११ परितोषिके मिळवून स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले, तर सर्वसाधारण उपविजेतेपद जळगाव विद्यापीठाला मिळाले असून मुंबई विद्यापीठ तिसऱ्या क्रमांकावर आहे. रविवार नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, एनसीएलचे जैवरासायनिक विज्ञान विभागाचे माजी उपसंचालक डॉ. अनिल लचके आदींच्या उपस्थितीत पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. विद्यापीठाचे बीसीयुडी डॉ. व्ही. बी. गायकवाड, स्पर्धेचे समन्वयक डॉ. रवींद्र जायभाये आदींनी स्पर्धेसाठी घेतलेल्या परिश्रमामुळे हे यश मिळाले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पराग शिंदे यांना मानवशास्त्र, भाषा आणि ललितकला या विभागातील पदवीस्तरावरील पारितोषिक मिळाले, तसेच शिक्षक स्तरावरील प्रथम पारितोषिक सुरेश जुंगारी यांनी पटकावले. औषध आणि फार्मसी या विभागातील पदवी स्तरावरील प्रथम पारितोषिक ऋतुजा जगतापला मिळाले. वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र आणि विधी या विभागातील शिक्षकस्तरावरील प्रथम पारितोषिक विशाल अमोलिक यांना, तर द्वितीय पारितोषिक देवयानी पाटील यांना मिळाले. विज्ञान विभागातील पोस्ट पदव्युत्तरस्तरावरील प्रथम पारितोषिक ऋचा देशपांडेला मिळाले. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या विभागातील पदवीस्तरावरील प्रथम पारितोषिक अनुज नहारने पटकावले, तर शिक्षकस्तरावरील द्वितीय पारितोषिक संदीपकुमार वानखेडे यांना मिळाले.(प्रतिनिधी)