शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाचा १११ वा पदवीप्रदान समारंभ रद्द

By admin | Updated: May 10, 2017 03:57 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून येत्या ११ मे रोजी आयोजित ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून येत्या ११ मे रोजी आयोजित ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेला १११ वा पदवीदान समारंभ अचानक रदद् करण्यात आला आहे. तांत्रिक कारणास्तव समारंभ रदद् करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कर्मचारी संघाने मंगळवारी सायंकाळी पत्रक काढून समारंभ उधळून लावण्याची धमकी दिली होती, यापार्श्वभुमीवर विद्यापीठाकडून समारंभच रदद् करण्यात आल्याचे चर्चा रंगली आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) वर्षातून दोन वेळा पदवीदान समारंभ आयोजित करण्याचे निर्देश विद्यापीठांना दिले आहेत. त्यानुसार वर्षातील दुसरा पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा समारंभ ११ मे रोजी होणार असल्याची माहिती प्रभारी कुलसचिव अरविंद शाळीग्राम यांनी मंगळवारी दुपारी ५ वाजता पत्रकार परिषदेमध्ये दिली. त्यानंतर अवघ्या ३ तासांमध्ये हा पदवीदान समारंभ रदद् करण्याचे पत्रक विद्यापीठाच्यावतीने काढण्यात आले आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे ११ मे होणारा पदवीदान समारंभ स्थगित करण्यात आलेला असून पुढील पदवीदान समारंभाची माहिती नंतर जाहीर करण्यात येईल असे या पत्रकामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.