शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारपासून विद्यापीठाची सराव परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:11 IST

पुणे : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पहिल्या सत्राची ऑनलाइन परीक्षा येत्या १० एप्रिलपासून ...

पुणे : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची पहिल्या सत्राची ऑनलाइन परीक्षा येत्या १० एप्रिलपासून सुरू होणार आहे. परंतु, तत्पूर्वी विद्यार्थ्यांना येत्या ५ ते ९ एप्रिल या कालावधीत मॉक टेस्टद्वारे परीक्षेचा सराव करता येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठाने दिलेल्या मुदतीमध्ये मॉक टेस्ट द्यावी, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

मागील वर्षी कोरोनामुळे विद्यार्थ्यांची अंतिम सत्राची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. मात्र, आता प्रथम वर्ष ते अंतिम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहे. अंतिम वर्षाची परीक्षा प्राॅक्टर्ड पद्धतीने घेणे शक्य झाले नव्हते. परंतु, यंदा सर्व विद्यार्थ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे.

विद्यापीठाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या ऑनलाइन परीक्षेची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी मॉक टेस्ट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थी सोमवारपासून (दि.५) नमुना प्रश्न सोडवू शकतील. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव करता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचा नोंदणीकृत ई-मेल आयडी व मोबाइल क्रमांक कार्यान्वित करणे आवश्‍यक आहे. सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीतच विद्यार्थी परीक्षेचा सराव करू शकतील .

--

सराव परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दिलेला कालावधी

- विज्ञान व अभियांत्रिकी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी ५ एप्रिल रोजी सराव करू शकतील.

- केवळ वाणिज्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ६ एप्रिल रोजी सराव करता येईल.

- कला, फार्मसी, शिक्षणशास्त्र शारीरिक शिक्षण या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी ७ एप्रिल रोजी सराव करू शकतील.

- ८ एप्रिल रोजी केवळ अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सराव परीक्षा देता येईल.

- विधी आणि व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाचे विद्यार्थी ९ एप्रिल रोजी सराव परीक्षा देऊ शकतील.

--

परीक्षेसाठी www.sppuexam.in या संकेतस्थळाचा वापर करावा. सराव परीक्षेसाठी युजरनेम व पासवर्ड मोबाइलवर एसएमएस केला जाणार आहे तसेच स्टुडन्ट प्रोफाईल सिस्टीम वरती पाठविला जाणार आहे, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.