शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात वाढला टग्यांचा उपद्रव

By admin | Updated: November 22, 2014 23:18 IST

सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाच्या आवारात गेल्या काही दिवसांपासून काही ‘टग्यां’चा उपद्रव वाढला

पुणो : सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाच्या आवारात गेल्या काही दिवसांपासून काही  ‘टग्यां’चा उपद्रव वाढला असून दिवसाढवळ्या मारहाणीपासून ते विद्यार्थीनींच्या छेडछाडीर्पयत त्यांची मजल गेल्याचे चित्र आहे. गेल्या काही वर्षामध्ये घडलेल्या घटनांमुळे विद्यापीठाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. परंतु, त्यावर उपाययोजना करण्यात विद्यापीठ प्रशासनाकडून दिरंगाई केली जात आहे. त्यामुळेच शुक्रवारी विद्यापीठाच्या आवारात काही मुलांनी तलवारी आणि हॉकी स्टिक घेवून मारामारी केल्याची घटना घडली.
विद्यापीठाच्या सेवक वसाहतीतील मुलांमध्ये आणि विद्यापीठाबाहेरील मुलांमध्ये शुक्रवारी हातात तलवारी घेवून मारामारी झाली. दिवसा ढवळ्या विद्यापीठाच्या आवारात विद्यापीठाच्या आवारात तलवारी उपसल्या जातात. त्यामुळे विद्यापीठाच्या आवारात कोणीही येवून काहीही करू शकतो, असाच अर्थ काढला जात आहे. त्यामुळे विद्यापीठाला आयुका गेट मार्गे येणा-या वाहनांवर आणि मुख्य प्रवेश द्वारातून ये- जा करणा-या वाहनांवर अधिक चाणाक्षपणो लक्ष द्यावे लागणार आहे. विद्यापीठाने सुरक्षेबाबत काही योजना आखल्या आहेत. परंतु,त्या जलद गदीने राबविण्यात विद्यापीठ अपयशी ठरत आहेत.
विद्यापीठच्या आवारात एका प्रेमी युगलाने विद्यापीठच्याच एका सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाच्या सुरक्षा यंत्रणोविषयी प्रश्नचिन्ह निमाण व्हायला सुरूवात झाली. परिणामी विद्यापीठाने काही बंदूकधारी सुरक्षा रक्षकांची विद्यापीठात नियुक्ती केली. परंतु,सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाकडे स्वत:चे 30 ते 35 आणि सुमारे 100 कंत्रटी तत्त्वावरील सुरक्षा रक्षक आहेत. या सुरक्षा रक्षकांच्या खांद्यावर विद्यापीठाची सुरक्षा यंत्रणा आहे. ते तोकडे पडत असल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सीसीटीव्ही 
कॅमे-यांच्या सहाय्याने विद्यापीठात येणा-या जाणा-या प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवावी लागणार आहे.
विद्यापीठ प्रशासनाने परिसरातील पुतळ्यांच्या सुरक्षेकडे मात्र गंभीरपणो लक्ष दिले असल्याचे निदर्शनास येत आहे. आजर्पयत याबाबत कोणत्याही पद्धतीचा गैरप्रकार घडलेला नसल्याचे चित्र आहे. पुतळ्यांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. परंतु, विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ आणि विद्यापीठातून बाहेर पडणा-या मार्गावर बसविण्यात आलेले सीसीटीव्ही निकृष्ट दर्जाचे आहेत. तसेच या सीसीटीची देखभाल करण्यासाठी सक्षम यंत्रणा विद्यापीठाकडे उपलब्ध नाही.