शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
2
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
3
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
4
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
5
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
6
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
7
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
8
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
9
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
10
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
11
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
12
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
13
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
14
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
15
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
16
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
17
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
18
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
19
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
20
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?

नियमावलीत अडकली विद्यापीठाची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:12 IST

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या येत्या १५ मार्चपासून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा काही विशिष्ट नियमांची अंमलबजावणी न केल्यामुळे पुढे ...

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या येत्या १५ मार्चपासून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा काही विशिष्ट नियमांची अंमलबजावणी न केल्यामुळे पुढे ढकलाव्या लागतील,अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, नियोजित कालावधीत परीक्षा होणार किंवा नाही,याबाबत निर्माण झालेला संभ्रम विद्यापीठाने दूर करावा,अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

पुणे विद्यापीठाशी संलग्न तीनही जिल्ह्यांमधील सुमारे साडेसहा लाख विद्यार्थ्यांची परीक्षा १५ मार्चपासून सुरू करण्याबाबत डिसेंबर महिन्यात झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत चर्चा केली होती. त्यामुळे परीक्षेची तयारी डिसेंबर महिन्यापासूनच सुरू झाली होती. तसेच विविध विषयांच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याची प्रक्रियासुध्दा सुरू केली. परंतु, विद्यापीठाने परीक्षेसाठी एजन्सी निवडीची प्रक्रिया नियमानुसार केली नाही, अशी माहिती समोर आली. मात्र, विद्यापीठ परीक्षेच्या कामासाठी नवी एजन्सी निवडणार की विद्यापीठाच्या स्वत:च्या दोन कंपन्यांच्या मदतीने परीक्षा घेणार याबाबत विद्यापीठाकडून कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

विद्यापीठ प्रशासनाने अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी निवडलेली एजन्सी मार्च महिन्यात होणाऱ्या परीक्षा घेण्यास नियमानुसार पात्र ठरत नाही. तसेच या एजन्सीला परीक्षेचे काम देण्याबाबत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने आणि परचेस कमिटीने मान्यता दिलेली नाही. त्यामुळे विद्यापीठाला परीक्षेच्या कामकाजासाठी निविदा काढून नवीन एजन्सी निवडावी लागणार आहे. परिणामी परीक्षा एक ते दीड महिने पुढे जाणार आहे. परंतु, विद्यापीठाने स्वत:च्या कंपन्यांच्या माध्यमातून परीक्षा घेण्याबाबत चाचपणी केल्यास यातून मार्ग काढता येईल, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.