शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसांचे अनोखे रक्षाबंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 03:31 IST

‘बहीण जशी भावाला राखी बांधून भावाकडून रक्षणाची अपेक्षा करते. तसेच आम्ही आपणास राखी बांधून वाहतूक नियमांचे रक्षण करण्याची अपेक्षा करतो.’ अशा आशयाची भेटपत्रे आणि राख्या घेऊन वाहतूक पोलिसांनी अनोखे रक्षाबंधन साजरे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘बहीण जशी भावाला राखी बांधून भावाकडून रक्षणाची अपेक्षा करते. तसेच आम्ही आपणास राखी बांधून वाहतूक नियमांचे रक्षण करण्याची अपेक्षा करतो.’ अशा आशयाची भेटपत्रे आणि राख्या घेऊन वाहतूक पोलिसांनी अनोखे रक्षाबंधन साजरे केले. या वेळी वाहनचालकांना स्वयंसेवी संस्थेच्या महिला कार्यकर्त्या तसेच महिला पोलिसांनी वाहनचालकांना राख्या बांधून रस्ता सुरक्षेचे आवाहन केले.वाहतूक शाखेचे उपायुक्त अशोक मोराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी वाहनचालकांचे प्रबोधन करुन अपघातमुक्तीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्याआहेत.सांगवी वाहतूक विभागाचे निरीक्षक किशोर म्हसवडे आणि त्यांच्या पथकानेही जनजागृती मोहीम घेतली. या वेळी ५ हजार ग्रीटिंग आणि ५ हजार राख्या वर्गणी काढून विकत घेतल्या. बा. रा. घोलप विद्यालय, मनपा शाळा, पिंपळे निलख येथील विद्यार्थी व शिक्षकांसह रक्षक चौक, वाकड वाय जंक्शन चौक, तापकीर चौक, व शिवार चौकात जनजागृती घेण्यात आली.अनेक वाहनचालकांनी पोलिसांसोबत राखी बांधून घेताना सेल्फी घेतले. या उपक्रमाला उपायुक्त अशोक मोराळे, सहायकआयुक्त राजेंद्र भामरे यांनीउपस्थित राहून पोलिसांचा हुरुप वाढवला.शुभेच्छापत्रकांचे वाटपरक्षाबंधनाच्या निमित्ताने वाहनचालकांना राख्या बांधून नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्याची संकल्पना आयुक्त शुक्ला यांनी मांडली. त्यानुसार, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील प्रमुख चौकांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणारी शुभेच्छापत्रेही या वेळी पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी वाटली.रक्षाबंधन साजरेपुणे: पुणे रॉयल ग्रुप व लीलाबाई कपूरचंदजी राठोड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त शहरामधील विविध सामाजिक संस्थांना नॅपकिन्स, सतरंज्या, राख्या व मिठाई भेट देण्यात आली. कार्यक्रमास विमल संघवी, नितीन जैन, संतोष राठोड, तुषांत राठोड, हिराचंद राठोड, महावीर पारेख, संतोष परमार, राजू नाणेचा, हितेश जैन, नरेंद्र ओसवाल, जीवन शहा, कल्पेश जैन, सुनील जैन, बाळा ओसवाल आदी उपस्थित होते .कृत्रिम अवयवकेंद्रात रक्षाबंधनपुणे : दि पूना होलसेल ग्रेन अ‍ॅण्ड ग्रोसरी मर्चंट्स असोसिएशनच्या पदाधिकाºयांच्या कुटुंबीयांनी वानवडी येथील कृत्रिम अवयव सेंटर येथील जवानांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. कार्यक्रमास आॅफिसर कमांडर एस. के. सिंग, ब्रिगेडियर एस. आर. घोष, जे. एस. राव, आर. एन. गुर्जर आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष संजय चोरबेले, उपाध्यक्ष नितीन ओस्तवाल, सचिव विकास बोरा, देवेंद्र अगरवाल, सुनील शिंगवी, अतुल गुंदेचा, सुहास दोशी, मनोज लोढा व संतोष यांनी सहपरिवार उपस्थित राहून जवानांचे औक्षण केले.मैत्री युवा संस्थेत मुलांना धान्यपुणे : मैत्र युवा फाउंडेशनच्या वतीने बुधवार पेठेतील सहेली या संस्थेत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे झाले. संस्थेतील मुलांना धान्य व खेळण्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, सहायक पोलीस निरीक्षक सूरज पाटील, फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे, प्रतीक्षा पारखी, मधुरा गोकर्ण, प्रतीक लांजेवार उपस्थित होते.