शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

ताला-सुराचा अनोखा मिलाफ

By admin | Updated: February 13, 2017 01:13 IST

‘जय शिव, शिव शिव शंकर’ या कथक रचनेतून सादर झालेला नृत्याविष्कार, अरविंदकुमार आझाद यांनी तबलावादनातून घडवलेली तालसफर

पुणे : ‘जय शिव, शिव शिव शंकर’ या कथक रचनेतून सादर झालेला नृत्याविष्कार, अरविंदकुमार आझाद यांनी तबलावादनातून घडवलेली तालसफर, डॉ. माधुरी जोशी यांची ‘मोहे छेडो ना नंदके सुनहू छेल मोहे’ या सुरेल बंदिशीची पेशकश, हार्मोनियम आणि तबल्याच्या एकल सादरीकरणातून पेश केलेला ताला-सुराचा अनोखा नजराणा अशा बहारदार नृत्याविष्कार व वाद्यांच्या सुरावटींत तालशिक्षक गोविंदराव जोशी (जोशीबुवा) यांना कलाकारांनी अनोखी आदरांजली वाहिली.निमित्त होते नृत्यभारती कथक डान्स अ‍ॅकॅडमीच्या स्थापनेपासून सलग ४५ वर्षे सहवादक, संगीतकार आणि तालशिक्षक म्हणून साथ देणाऱ्या गोविंदराव जोशी यांच्या २५ व्या स्मृतीवर्षानिमित्त व नृत्यभारतीच्या ७० व्या वर्षानिमित्त नृत्यभारती परिवार आणि सुनीता पुरोहित प्रस्तुत ‘उजवी बाजू’ या कार्यक्रमाचे. कोथरूड येथील बालशिक्षण मंदिर सभागृहात झालेल्या याकार्यक्रमात जोशी यांनी संगीतबद्ध केलेल्या पदांवरील नृत्यरचना, गाणी व त्यांच्यावरील ध्वनिचित्रफीत सादर करण्यात आली. कार्यक्रमात रोहिणी भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या शरदिनी गोळे, गायिका डॉ. माधुरी जोशी, अजय पराड, पं. अरविंदकुमार आझाद, ज्येष्ठ व्हायोलिनवादक रमाकांत परांजपे, सतारवादक अतुल केसकर, ज्येष्ठ तबलावादक पांडुरंग मुखडे, गायक श्रीपाद भावे, माणिक पंडितराव, अनुराधा कुबेर, सुनील अवचट, चैतन्य कुंटे, तालवाद्यवादक आमोद कुलकर्णी, छायाचित्रकार कौस्तुभ अत्रे, मिलिंद फडणीस, शीतल ओक आदी कलाकारांचा सन्मान या वेळी केला. (प्रतिनिधी)नृत्याविष्काराला रसिकांची दाद४कार्यक्रमाची सुुरुवात ‘विनायकम गुरुम् भानुम’ या गणेशवंदनेने झाली. त्यानंतर गोविंदराव जोशी यांनी संगीतबद्ध केलेले ‘मुकुटात मनोहर मोर पीसे’ हे कृष्णवर्णनपर पद सादर करण्यात आले. ज्येष्ठ संगीतकार अजय पराड यांनी हार्मोनियमवादनातून ‘गणेश कंस’ राग सादर करीत रसिकांची मने जिंकली. त्यांना किशोर कोरडे यांनी तबल्यावर साथ केली. ४डॉ. माधुरी जोशी यांनी तुकाराम महाराजांचा ‘श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभ नारायणा’ हा अभंग सादर करत वातावरणात रंग भरला. त्यांना अभिजित जायदे यांनी तबल्यावर साथ दिली. पं. अरविंदकुमार आझाद यांनी साडेपाच मात्रांचा ‘महात्मा’ हा नवीन ताल सादर करीत गुरु रोहिणी भाटे आणि गोविंदराव जोशी यांना श्रद्धांजली वाहिली. नृत्यभारतीच्या विद्यार्थिनींनी केलेल्या नृत्याविष्काराला उपस्थितांनी दाद दिली.