दौंड : दौंड तालुक्यातील पेडगाव, मलठण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळूउपसा सुरू असून, याचा उपद्रव या परिसरातील ग्रामस्थांना होत आहे. या भागातील वाळूउपसा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने तातडीने बंद करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, या भागातील वाळूउपसा बंद न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा या भागातील शेतकऱ्यांनी दिला आहे. मलठण परिसरातील लिंगाळी या भागात मोठ्या प्रमाणावर वाळूउपसा सुरू आहे, अशीच परिस्थिती पेडगाव परिसरात आहे. नदी काठावरून काढलेली वाळू शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टाकली जाते आणि वाळू टाकण्यासाठी शेतकऱ्यांनी विरोध केल्यास त्याला दमदाटी करून मारहाणही केली जाते. परिणामी शस्त्राचा धाकदेखील दाखविला जात असल्याच्या घटना घडलेल्या आहेत. महसूल विभागाने पोलिसांच्या मदतीने वाळूमाफियांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मलठण येथे बेसुमार वाळूउपसा
By admin | Updated: March 23, 2017 04:05 IST