शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

‘अनफिट’ बस तपासणीला डॉक्टरच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 02:33 IST

शहरातील विविध मार्गांवर धावणाऱ्या ‘अनफिट’ बसची तपासणी करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन अधिका-यांनी दिले आहेत.

पुणे : शहरातील विविध मार्गांवर धावणाऱ्या ‘अनफिट’ बसची तपासणी करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन अधिका-यांनी दिले आहेत. पण प्रत्यक्षात या आदेशाची अंमलबजावणी कोण करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. आरटीओकडे तपासणीसाठी आवश्यक मनुष्यबळच उपलब्ध होत नसल्याने बस तपासणी होणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.एका प्रवाशाने केलेल्या तक्रारीनंतर आरटीओतील अधिकाºयाने बसची तपासणी करून अनफिट ठरविले. पण ही एकच बस अनफिट नसून दररोज शेकडो बस तांत्रिक त्रुटी असूनही मार्गावरधावत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे आरटीओने मार्गावरील सर्वच बसची तपासणी करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. याबाबत काही प्रवाशांनी आरटीओकडे ई-मेलद्वारे तक्रारीही केल्या आहेत. तसेच प्रवाशांची मागणी विचारात घेऊन आरटीओकडून संबंधित अधिकाºयांना तपासणीचे आदेशही दिले आहेत. पण प्रत्यक्षात ही तपासणी कोण करणार, ही चिंता अधिकाºयांना सतावत आहे.आरटीओमध्ये सध्या मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे दैनंदिन कामे करणेही शक्य होत नाही. त्यामुळे स्वतंत्र पथके नेमून बस तपासणी करणे शक्य होत नाही. असे केल्यास इतर कामांवरविपरीत परिणाम होतो, असे अधिकाºयांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे पीएमपी प्रशासन जुन्या बसकडे बोट दाखवत आहे.दोन्ही यंत्रणांच्या हतबलतेमुळे मात्र प्रवासी बेजार झाले आहेत. खिळखिळ््या बसमधूनच त्यांनाप्रवास करावा लागत आहे. दररोज तक्रारी करूनही स्थिती सुधारत नाही. हा प्रशासनाची अंतर्गत बाबअसून त्यात प्रवासी भरडलेजात असल्याची नाराजी पीएमपी प्रवासी मंचचे संजय शितोळे यांनी व्यक्त केली.