शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आठवणीतून उलगडले अनोखे पुणे

By admin | Updated: April 24, 2017 05:13 IST

कसब्यापुरते मर्यादित असलेल्या पुण्याचा पुनवडी ते माहिती तंत्रज्ञानाचं एक प्रमुख केंद्र म्हणून होत असलेल्या वाटचालीचा इतिहास

पुणे : कसब्यापुरते मर्यादित असलेल्या पुण्याचा पुनवडी ते माहिती तंत्रज्ञानाचं एक प्रमुख केंद्र म्हणून होत असलेल्या वाटचालीचा इतिहास ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी उलगडून सांगताना सभागृह पुण्याच्या आठवणींमध्ये हरवून गेले होते. निमित्त होते ‘हरवलेले पुणे’ या डॉ. अविनाश सोवनी लिखित पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे. रविवारी झालेल्या या सोहळ्यास भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस डॉ. श्री. मा. भावे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उन्मेष प्रकाशनच्या मेधा राजहंस मंचावर उपस्थित होत्या. मनोगतात पुण्याच्या इतिहासाच्या आठवणी सांगताना बलकवडे यांनी उपस्थितांना त्या काळात नेऊन ठेवले. पुणे शहराचा एक छोटसं गाव ते महानगरापर्यंतच्या प्रवासावर त्यांनी प्रकाश टाकला. मनोगतात ते म्हणाले, ‘‘१८६५ मध्ये ना. वि. जोशी यांनी पुण्याच्या इतिहासावर लेखन करत ‘पुनवडी ते पुणे’ ही संकल्पना मांडली. शिवरायांच्या पुण्यातील आगमनाने पुणे हे भारताचे केंद्रबिंदू झाले. आठव्या व नवव्या शतकात प्रशासकीय शहर म्हणून असलेली पुण्याची ओळख यादवांच्या काळात धार्मिक अशी झाली. या शहरावर गाढवाचा नांगर फिरला असून हे शहर वास्तव्यास योग्य नाही अशा पसरवल्या गेलेल्या समजाला जिजाऊंनी शिवाजीमहाराजांना घेऊन पुण्यात वास्तव्य केल्याने खऱ्या अर्थाने तडा गेला.’’ डॉ. श्री. मा. भावे यांनी लहानपणापासूनच्या पुण्यासोबतच्या आठवणी सांगितल्या. पुणे हे हिरवळीचं शहर होतं मात्र ही ओळख आता हळूहळू आपण पुसत असून आता सिमेंटचं पुणे अशी नवी ओळख आपण तयार करत आहोत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. पुण्याला गॉर्डन सिटी आॅफ डेक्कन असे इंग्रजांनी संबोधले होते असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)