शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कामगारांवर बेरोजगारीची नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2015 05:54 IST

भोर तालुक्याने अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक छोट्या-मोठ्या उद्योगांची भरभराट पाहिली आहे. त्याचा फायदाही या परिसराला झाला.

भोर : भोर तालुक्याने अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक छोट्या-मोठ्या उद्योगांची भरभराट पाहिली आहे. त्याचा फायदाही या परिसराला झाला. मात्र, तालुक्याचे वैभव असलेले हे उद्योग अलीकडच्या काळात एकामागून एक बंद पडले. त्यामुळे शेकडो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. तालुक्याला पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करणे आवश्यक आहे. त्यासाठी राजकीय पक्षांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.भोर हे संस्थानकाळापासून भाटघर धरणामुळे अग्रेसर होते. त्यानंतर ठाकरसी ग्रुपने फोम लेदरमध्ये मजल मारून मार्केट मिळवले तसेच आरलॅब्ज कंपनीने रंग तयार करून रशियाची बाजारपेठ मिळवली आणि भोरचे नाव जगाच्या नकाशावर नेले. या शिवाय स्टील गु्रप, यशवंत सूत गिरणी अशा प्रकारचे उद्योग सुरु होते. सुमारे साडेतीन हजार कामगार आपली शेती करून नोकरी करीत होते. भोर नगरपलिकेने ३७ एकरांत छोट्या उद्योगांसाठी औद्योगिक वसाहत उभारली होती, तीही बंद पडली आहे. भोर तालुक्याचा पश्चिम भाग दुर्गम डोंगरी असल्याने जिरायती शेती आणि तेही फक्त भात पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीच्या उत्पन्नावर असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येत असल्याने शाळा शिकायची सोडून कुटुंबाला हातभार लावण्यास १०वी नंतर मुले कामधंद्यासाठी पुणे-मुंबईला जाऊन हमाली करतात किंवा दुकानात काम करून उदरनिर्वह भागवून उरलेले पैसे घरी पाठवतात.(वार्ताहर)विकासकामांकडे दुर्लक्ष४पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यांपैकी पुरंदर तालुक्यामधील सासवडचा झपाट्याने विकास झाला. दौंड, बारामती, इंदापूर, मुळशी, मावळ, खेड या तालुक्यांचा विकास झाला. मात्र, पुणे शहरापासून भोर अवघ्या ५० किलोमीटरवर असूनही भोर, वेल्हे या तालुक्यांचा विकास झाला नाही. पूर्वेकडील तालुक्यांना पाणी देण्याची जबाबदारी या दोन्ही तालुक्यांनी घेऊनही कोणतीच अपेक्षा ठेवली नाही. औद्योगिक वसाहती सुरूकरणे गरजेचे ४भोर तालुक्यात राजकीय पक्षांकडून औद्योगिक वसाहती सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे; मात्र प्रत्यक्षात होत नाही. ती खरोखरच पूर्ण झाल्यास पर्यटनाचा विकास झाल्यास भोर तालुक्यातील बेरोजगारी कमी होऊन तालुक्याचा विकास होणार आहे. त्यासाठी राजकीय नेत्यांनी निवडणुका आल्यावर भांडवल करण्याऐवजी प्रत्यक्षात पुढाकार घेऊन काम करणे गरजेचे आहे, तरच ते शक्य आहे.