शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक सहायकांवर बेकारीची कु-हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:18 IST

गर्दीच्या चौकांमध्ये वाहतूक शाखेच्या पोलिसांबरोबर राखाडी रंगाच्या गणवेशात उभे राहून त्यांना वाहतूक नियंत्रणासाठी साह्य करणारे महापालिकेचे ट्रॅ्फिक वॉर्डन आता दिसणार नाहीत.

पुणे : गर्दीच्या चौकांमध्ये वाहतूक शाखेच्या पोलिसांबरोबर राखाडी रंगाच्या गणवेशात उभे राहून त्यांना वाहतूक नियंत्रणासाठी साह्य करणारे महापालिकेचे ट्रॅ्फिक वॉर्डन आता दिसणार नाहीत. सलग १० वर्षांपासून सुरू असलेली ही सेवा महापालिकेने अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १५० जणांवर बेकारीची कुºहाड कोसळली असून, त्यांचे ५ महिन्यांचे वेतनही महापालिकेने थकवले आहे.राष्ट्रकूल स्पर्धा पुण्यात झाल्या त्या वेळी म्हणजे साधारण १० वर्षांपूर्वी महापालिकेने शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी म्हणून ही पद्धत सुरू केली होती. त्या वेळी विविध देशांमधून बरेच पाहुणे शहरात येणार होते. त्याशिवाय खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक अशी गर्दीच पुण्यात होणार होती. वाहतूक पोलिसांनी एकट्याने या सगळ्या वाहतुकीचे नियंत्रण करता येणे शक्य नव्हते व सगळीकडे वाहतूक पोलीस देता येतील, अशी स्थितीही नव्हती. त्यामुळेच महापालिकेच्या तत्कालीन पदाधिकाºयांनी ही ट्रॅफिक वॉर्डनची पद्धत सुरू केली. गेली १० वर्षे ती सुरू होती, मात्र आता महापालिकेने लेखापरीक्षकांनी खर्चावर आक्षेप घेतले असल्याचे सांगून ही पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.तसे पत्रच त्यांनी हे वॉर्डन ज्यांच्याकडून घेतले गेले त्या जिल्हा सुरक्षारक्षक महामंडळाला पाठवले आहे. त्यामुळे गेली सलग १० वर्षे हे काम करणाºया कर्मचाºयांवर बेकारीची वेळ आली आहे. त्यांना महापालिकेच्या नोकरीत कायम व्हायचे नव्हते किंवा तशीत्यांची मागणीही नव्हती. तरीही महापालिकेने त्यांची नोकरी बंदकेली आहे. पुन्हा असे करताना या १५० जणांचे वेतनही महापालिकेने अदा केलेले नाही. सलग ५ महिन्यांचे वेतन या १५० कामगारांना मिळालेले नाही. त्याची मागणी करून महामंडळाचे पदाधिकारी थकून गेले आहेत. त्यातच आता ही सेवा बंद करण्याचे पत्र महापालिकेकडून मिळाल्याने या १५० जणांचे करायचे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.राखी रंगाचा गणवेश असलेल्या सुमारे १५० जणांची या कामासाठी जिल्हा सुरक्षा रक्षक महामंडळाकडून नियुक्ती करण्यात आली. त्यांना सध्या दरमहा १३ हजार रूपये वेतन मिळते. सुरुवातीला वाहतूक शाखा व महापालिका यांनी संयुक्तपणे ही जबाबदारी घ्यायची, असे ठरलेहोते, मात्र वाहतूक शाखेनेकधीही त्यासाठी पैसे दिलेनाहीत, त्यामुळेच महापालिकाच दर वर्षी या ट्रॅफिक वॉर्डनच्या वेतनासाठी म्हणून ५ ते साडेपाच कोटी रूपयांची तरतूद अंदाजपत्रकात करत होती. त्यांच्याकडून ते पैसे महामंडळाकडे जमा होत असत व महामंडळ ते वॉर्डनच्या खात्यात जमा करीत असत.