शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक सरंक्षण कायदा समजून घ्या

By admin | Updated: December 24, 2015 00:37 IST

प्रत्येक जण हा आयुष्यभर ग्राहकच असतो. नागरिकांवर होणाऱ्या फसवणुकीबाबत व अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी प्रत्येकाने ग्राहक संरक्षण कायदा

पिंपरी : प्रत्येक जण हा आयुष्यभर ग्राहकच असतो. नागरिकांवर होणाऱ्या फसवणुकीबाबत व अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी प्रत्येकाने ग्राहक संरक्षण कायदा समजून घेणे आवश्यक आहे, असे मत व्याख्याते रमेश सरदेसाई यांनी व्यक्त केले. सांगवी येथील स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये झालेल्या अखिल भारतीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने ते बोलत होते. सरदेसाई यांचा सत्कार सहायक आयुक्त आशादेवी दुगुर्डे व प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ग्रंथपाल कल्पना जाधव व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. भारतातील प्रत्येक नागरिकाने जागरुक राहणे महत्त्वाचे असून, रोजच्या जीवनक्रमात प्रत्येक ग्राहकाच्या होणाऱ्या फसवणुकीबाबत प्रत्येकाने जाब विचारला पाहिजे. यासाठी ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहक पंचायतीची उद्दिष्टे याबाबतची माहिती समजून घेणे गरजेचे आहे. हॉस्पिटल, न्यायालय, वाहन परिवहन, हवाई सेवा, जलप्रवास, विद्युतसेवा, सर्व राज्यांतील महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांच्याकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा पारदर्शी करण्यासाठी ग्राहक पंचायतींची आवश्यकता आहे. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, तसेच सार्वजनिक क्षेत्रात लोकांच्या अडाणीपणामुळे लोकांचे शोषण होत असून, यामुळे त्यांचा अर्थिक दर्जा उंचावत नसल्याने सामाजिक असमतोल वाढल्याचे दिसून येते, असे सरदेसाई म्हणाले. प्रास्ताविक प्रशासन अधिकारी बोदडे यांनी केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी केले.(प्रतिनिधी)